मी पणाचा पराभाव :- एक किस्सा स्वामी समर्थांचा
स्वामी समर्थ बाबा सबनीस एक प्रकांड विद्वान कीर्तनकार होते. राम मंदिरात त्यांचे कीर्तन होते. सर्व लोकं मंत्र-मुग्ध होऊन कीर्तन ऐकतात. तिथे हरीबाई नावाची एक बाई येते आणी मंदिराच्या पायरीवर किर्तना कडे पाठ करुन रामाचे नामस्मरण करत बसते. कीर्तन संपल्यावर हरी बाईला बाबा सबनीस विचारतात-" तुम्हाला काय आम्ह्चे कीर्तन ऐकावे असे नाही वाटत का?" हरी बाई थोड्या फटकल पणे बोलते-"या मोठ्या-मोठ्या गोष्टी मला समझत नाही.कानातून मनात पोहचत नाही. " "आम्हाला आमचे स्वामींच्या साध्या-सरळ गोष्टी आवडतात." तितक्यात नारायण शास्त्री येउन बाबा सबनीसला म्हणतात: " तुम्ही या मुर्ख बाईशी काय वाद घालत आहा?' " या सर्वाना त्या भोंदू स्वामीनी वेड लावले आहे." मग शास्त्री बाबा सबनीसला म्हणातात की हनुमान जयंतीला स्वामी राम मंदिरात येणार आहे, तिथे तुम्ही आपल्या विद्वत्तेनी शास्त्रात त्यांचा पराभव करा. हनुमान जयंतीच्या दिवशी स्वामी मंदिरात येतात.ब...