Posts

Showing posts with the label मनामनातील अंतर - बोधकथा

मनामनातील अंतर - बोधकथा

एकदा गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, "आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?" सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दिले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो." यावर गौतम बुद्ध म्हणाले, "पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा आपण ओरडतो... जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो". यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच उत्तराने बुद्धांचे समाधान झाले नाही. शेवटी बुद्धांनी स्वतःच उत्तर दिले. ते म्हणाले, "जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढ्या आवाजात बोलतात." "आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?" असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणा