Posts

Showing posts with the label माणुसकी - बोधकथा

माणुसकी - बोधकथा

एका शहरात एक आजी संत्री विकायला बसायची. . एक दिवस तिच्या जवळ एक तरूण आला साधारण ३० एक वयाचा.. . त्याने आजीला विचारले,"आजी संत्री कशी दिली ग?" . आजीने भाव सांगितला.. . त्याने २ किलो संत्री विकत घेतली आणि त्यातल एक संत्र सोलुन एक फोड खाऊन तो तरुण आजीला म्हणाला,"आजी हे संत्र गोड आहे का बघा हो जरा?" . आजीने हात पुढे करत संत्र हातात घेऊन एक फोड खाल्ली. आणी म्हणाली "लेकरा गोडच हाय की" . तो हसत हसत आजीच्या हातातील ते संत्र न घेताच निघून गेला. . असच दुसरया दिवशीही तो आपल्या पत्नीला बरोबर घेऊन आला. त्या दिवशी ही त्याने संत्र्याची एक फोड खात संत्र गोड आहे का विचारत आजीच्या हातात संत्र देऊन हसत हसत घरी गेला. . असे बरेच दिवस निघून गेले. . आजीच्या शेजारची एक भाजीवाली व त्या तरूणाची पत्नी हे रोज पाहत असे. . एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले,"तु असा रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्र का देतोस आणि ते ही अर्ध खाऊन" . तो तरुण आपल्या पत्नीला म्हणाला,"अग वेडे आजी रोज ही संत्री विकते पण ती स्वतः कधीच  ही संत्री खात नाही, कारण तिला २ रूपये कमी मिळतील. मी तिला रोज एक...