जिवन विचार - 96
01. सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड करणे. -नेताजी सुभाषचंद्र बोस. 02. ईश्र्वर एकच व निर्गुण-निराकार आहे... ईश्र्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही... धार्मिक कर्मकांडावर विश्र्वास ठेवू नका !! -क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले. 03. सर्व प्रकारच्या अंधश्रध्दा आणि धर्माच्या नावाखाली केला जाणारा वेडाचार नष्ट करा. - नेताजी सुभाषचंद्र बोस. 04. जातीभेद एक मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की, तो झटकन बरा होतो. -विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 05. रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेचा इंतजार करा. एक दिवस तुमचाही उजाडेल. - सिंधुताई सपकाळ. 06. असत्याच्या बाजूने जरी बहुमत असले तरी ते स्विकारू नये. -संत तुकोबाराय. 07. प्रसन्न हवापाणी ऋतु । हाचि विवाहाचा मुहूर्त। बाकीचें झंजट फालतू । समजतों आम्ही ॥ दिवस पाहावा सुंदर । हावापाणी सोयीस्कर । सर्वांसि होईल सुखकर । म्हणोनिया ॥ लग्नासाठी कर्ज करावे । जन्म भर व्याज भरीत जावे ॥ पैश्या साठी कफल्लक व्हावे । कोन्या देवे सांगितले ॥ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. 08. आपले हक्क आपल्या कर्तव्या पेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही... आपण आपली कर