Posts

Showing posts with the label जीवन विचार

◼️कविता :- जीवन प्रवास

Image
निघालो प्रवासा, सोबतीला साथी. मनी नाही भिती, कसलीच...धृ डोईवर नभ, धरेवर पाय. हीच माझी माय, भासे मज...१ कष्ट रात दिस, जीवन प्रवास. फुलवून खास, वाढविला...२ दिसे सुखी जन, भरले नयन. सुखावले मन, आनंदाने...३ सुखाचा सागर, करुया जागर. मायेचा पाझर, काळजात...४   ✍️ खंदारे सुर्यभान गुणाजी    मु.पो.जलधारा ता.किनवट      संवाद- 9673804554

◼️ वैचारिक लेख :- घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो...!

Image
घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो...!                उद्या ह्याच पायरीवर तुम्ही असणार आहात...!               पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी माणसं असायची. त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा...!         कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा सल्ला घेतला जायचा. त्यांच्या अनुभवाचे सर्व विचार करायचे. त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील वयस्करांचे होते...        आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागले.              मोठी माणसं नाहीशी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे. मर्यादा, धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहिल्या आहेत...              पूर्वी ह्याच गोष्टी, चालीरीती घरातील मोठी माणसे सांगायची. म्हणून घरात मोठी वयस्कर माणसे पाहिजेत. संध्याकाळी दिवे लावणीला शुभंकरोति - रामरक्षा- आरतीचे स्वर कानावर पडायलाच पाहीजेत. रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्र

◼️ Bill gates :- एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व

Image
🎂 'मायक्रोसॉफ्ट’चे सहनिर्माते बिल गेट्स यांचा आज ६५ वा वाढदिवस. त्यांना लाख लाख शुभेच्छा! ---------------- बिल गेट्स हे अमेरिकन बिझिनेसमन, संशोधक, संगणक प्रोग्रामर आणि इन्व्हेस्टर आहेत. त्यांच्याकडे एकही पदवी नसून ते सध्या जगातले तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी २०व्या वर्षीच एका लहान गॅरेज मध्ये पॉल ॲलन सोबत ‘मायक्रोसॉफ्ट’ नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली होती, जी आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळखली जाते. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे १९८७ पासून ‘फोर्ब्ज’ या मासिकाने सादर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या प्रत्येक यादीत त्यांचे नाव असून, १९९५ पासून २०१७ पर्यंत फक्त चार वर्षे सोडून ते यादीत पहिल्या क्रमांकावर होते. ऑक्टोबर २०१७ मध्ये ॲमेझॉनच्या जेफ बेझोस यांनी त्यांना मागे टाकले. आज बेझोस यांची संपत्ती १९३.१ अब्ज डॉलर्स असून गेट्स यांची संपत्ती ११४.८ अब्ज डॉलर्स आहे.  गेट्स यांच्याबद्दल जितके बोलावे तितके थिटेच पडेल, अशी प्रचंड कमगिरी त्यांनी करून दाखवली आहे. अर्थात आर्थिक श्रीमं

◾ कविता :- जीवन एक कला

Image
जीवन जीवन म्हणजे कलाकृती, जगण्याचा सारा खेळ. अनुभव विश्वातुन, बसे जगण्याचा मेळ... वेळ प्रसंगाने येती , नित्य जीवना आकार  ज्याचा त्याचा अनुभव करी जीवन साकार... सुख दुःखांचा डोंगर, भाव विश्र्वाला व्यापते. मनी आठवणी साठा अंतःकरणात जपते... सुख समृद्ध जीवन, अनुभवाने साठते. गाठे यशाचं शिखर, ध्येय उद्दिष्ट गाठते...     ✍️ खंदारे सुर्यभान गुणाजी       मु.पो.जलधारा ता.किनवट         संवाद- 9673804554

जीवन विचार - 152

Image
जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा आयुष्य सुंदर असते पण जेव्हा तुमच्यामुळे इतरांना आनंद होतो तेव्हा आयुष्य सार्थकी लागते . आपल्यामुळे कधीही कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ देऊ नका . हसावता नाही आलं तरी अश्रूंचे कारण बनू नका . दुसऱ्यांच्या दुवा घ्या तळतळाट नको .            फक्त गरज पडल्यावर आठवण काढणाऱ्या माणसांवर कधीच रागवू नका .. कारण काही माणसं देवाचीही आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना कोणताच पर्याय दिसत नसतो .          संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होय . दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे . जेव्हा आपण दुसऱ्यासाठी दिवा लावतो तेव्हा आपलीही वाट उजळून निघते . फक्त माणूसकी जपायला शिका सर्व नाती आपोआप निभावली जातील .  🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴

आयुष्यात सुधारणा करू‍ शकणाऱ्या या पाच सवयी

Image
 ------------------------------------ आयुष्यात सुधारणा करू‍ शकणाऱ्या या पाच सवयी --------------------------------------- १) व्यायाम आणि ध्यान धारणा करा . तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल . तुमचा रागावर ताबा येईल आणि तुम्ही रिलॅक्स होता. २) पहाटे उठल्यावर तुमचं अंथरूण आणि खोली स्वच्छ करा . तुम्हाला ही लहान गोष्ट केल्यावर बाकीचे काम करायला प्रेरणा मिळेल. आळस सोडा . ३) अती विचार करणे सोडा . दुसऱ्याला नाही , तर याचा तुम्हालाच मानसिक त्रास होईल . तुमचा कामात लक्ष लागणार नाही . ४) प्रत्येक गोष्टीला पुरेपूर वेळ मिळायला एक वेळापत्रक बनवा.  तुमचे सर्व काम सुटसुटीत होईल आणि तुम्हाला शिस्त पाळणे उपयोगी पडेल . ५) दिवसातला किमान अर्धा तास तुमच्या आवडीचा छंद साठी द्या . ह्या सवयी तुम्हाला नक्कीच सुधारणा करायला मदत करतील ---------------------------------------------- 🌹 श्री   स्वामी परिवार 🌹 -----------------------------------------------

निबंध :- दगड

Image
शाळेत बाई म्हणाल्या : आपल्या आवडत्या विषयावर निबंध लिहा.. एका मुलाने निबंध लिहिला... विषय -                   दगड                     ____________________________________ 'दगड' म्हणजे 'देव' असतो.. कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो.. पाहीलं तर दिसतो.. अनोळख्या गल्लीत तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो.. हायवे वर गाव केव्हा लागणार आहे ते दाखवतो.. घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो.. स्वैयंपाक घरात आईला वाटण करून देतो..  मुलांना झाडावरच्या कैऱ्या, चिंचा पाडून देतो.. कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्या शत्रूची जाणीव करून देतो.. माथेफिरू तरुणांच्या हाती लागला तर,, काचा फोडून त्याचा राग शांत करतो.. रस्त्यावरच्या मजुराचं पोट सांभाळण्यासाठी स्वत:ला फोडुन घेतो.. शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी छिन्निचे घाव सहन करतो.. शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो.. बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो.. सतत आपल्या मदतीला धावून येतो, देवा'सारखा.. मला सांगा,, 'देव' सोडून कोणी करेल का आपल्यास

🤔 नेमके कलियुगात होणार तरी काय ?

Image
नेमके कलियुगात होणार तरी काय एक छान उदाहरण नक्की वाचा  💐🌸💐         एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- " कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल ? "        या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला," कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.       " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली.        सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.         जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे.        या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.        भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या.         एका विहरीभोवती चार विहीरी होत्या.         चार विहिरी

बोधकथा :- प्रारब्ध आणि संगत

Image
माणसाची ओळख ही त्याच्या संगती वरून ठरते. तुम्ही दोन पोपटाची गोष्ट वाचलीच असेल. एक चोरा जवळ राहतो आणि एक साधू जवळ दोघांच्यात झालेला बदल तुम्हाला माहित आहेच  ! ... खाली असाच एक लेख आहे ...   💐🌸💐 एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, " अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये." भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उदया माझ्याकडे ये!.. दुस-याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं. किड्याने परागरस चाखला.किती भाग्यवान मी!...अस म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या देवाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवानाचे दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

Image
------------------------------------------------------- 🔴 थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – विचार बनाये जिंदगी! ------------------------------------------------------- त्या घटनेला आज एकतीस वर्ष झाले.  तीन दशकांपासुन बॉलीवुडमध्ये आपलं स्टारपद अढळपणे मिरवणारा आमिर खान तेव्हा आपल्या वयाच्या विशीत होता, त्याचा चुलत काका मन्सुर खान ह्यांनी त्याला हिरो म्हणुन हिंदी सिनेमामध्ये लॉन्च करायचे ठरवले होते, फिल्मचे नाव होते, कयामत से कयामत तक, आणि ती एक लो बजेट फिल्म होती, चित्रपट पुर्ण झाला, पण सिनेमा बनवातानाच संपुर्ण बजेट संपले होते,  सिनेमाची प्रसिद्धी आणि प्रमोशन करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक ह्यांच्याकडे पुरेसे पैसेच उरले नाहीत. त्याकाळात तर केबल नेटवर्कही नव्हते, इंटरनेटही नव्हते, त्यामुळे चित्रपटांची प्रसिद्धी मुख्यतः पोस्टरमधुनच व्हायची. अमिर खान नवखा असला, कुमारवयीन असला, आणि पहील्याच सिनेमाचा हिरो असला तरी, लहानपणापासुन ह्या क्षेत्रात वावरल्याने त्याला सिनेमाच्या तंत्राची चांगली जाणीव होती.  कसलाही खर्च न करता, आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी त्याने आपल्या

जीवन विचार - 153

Image
  🔵🔵परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात🔵🔵 ⭕परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते; तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते.⭕ 🔘दुसर्‍याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो❓म्हणजे मग आपण यात काय साधले❓निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते.🔘 🌟ज्याला परनिंदा गोड वाटते, त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे.🌟 💮तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. म्हणून, ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी.💮 🏵भगवंताच्या मार्गाने जाणार्‍याने, दुसर्‍याच्या ठिकाणी दिसणार्‍या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे, आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे.🏵  ♦पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताचा आड येतात हे देखील कळते, पण

चिंतन करण्याचे फायदे !

Image
  🌼🌼✍🏻📖 *!!••चिं•त•न••!!* 📖✍🏻🌼🌼 मनुष्याच्या जीवनात केव्हातरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो अनेक व्रते,उपवास करतो पण देव त्याला लवकर मदत करत नाही.परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी रहाते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो.आपण नंतर म्हणतो सुध्दा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्र्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदत सुध्दा ईश्र्वर करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुध्दीयोग देण्याचे कार्य सुध्दा ईश्र्वराचे आहे  पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी *त्या व्यक्ती ला विसरू नये कारण देव स्वतः भेटू शकत नाही मदत करू शकत नाही म्हणून अश्या व्यक्ती ला पाठवतो* आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक नि

मन मनाच्या शोधात !

Image
                   मन मनाच्या शोधात...!     मन मोकळं करायचं असेल तर स्वतःशीच एकांतात संवाद करावा ...उत्तर सापडत असतं...! कारण शंभर टक्के आपलं ऐकून समजून घेणारं मन ...एखाद्या मनासाठी जणू अस्तित्वातच नसतं... ! क्वचितच एखाद्या मनाला असं मन गवसतं ...जे प्रत्येक्ष आपल्याच मनाची प्रतिमा असतं...!    अशीच आज भरल्या घरात सारं भौतिक  सुखवैभव असूनही अशांत शारदा एकटीच देव्हाऱ्यापुढे बसून देवाशी भांडत होती, रडत होती ,बोलत होती....!     "देवा, का मला जन्माला घातलय रे...काय साध्य करायचं होतं तुला माझ्या या आयुष्यातून"...प्रत्येकाचे जन्माचे विधिलिखित मांडलेले असते...पण मला कळतच नाही मी काय कसं वागू ..सर्वांच्या मनासारखं, हवं नको पुरवण्यातच दैनंदिन आयुष्य चाललय...पण मलाही मनातनं काही जाणीवा आहे ,जरा काही निवांतपण, काही हवंय का, हा विचारच नाही करत कोणी घरात...! आणि जसं मला आयुष्य जगायचं होतं तसं मला  वास्तव जगणं  नाही दिलस रे ,मग विचार करायची बुद्धी तरी का दिलीस रे?...मंदच ठेवायचस ना..घुम्याबैलासारखं कामच करत रहायला...!     नियतीने बांधून टाकलय कि मीच स्वतःला गुंतून घेत

ठेच :- एक आयुष्यातील उत्तम शिक्षक

Image
मित्रांनो !  आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !! कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी फाटावी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!  परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा काही ठिकाणी तर त्याला घाण टाकण्याची वेळ यावी, कधी तरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा कुणाची तरी हजारवेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री ह्या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा, रडून रडून डोळे सुजावेत इतका अफाट त्रास व्हावा ! अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं.!! अन् मग बघावं ह्या वेदनांतून तावून सुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन.!! "ज्याला कुणाच्या असण्या-नसण्याचा काही फरकच पडत नाही. तो जगतो फक्त "आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय"