निबंध :- दगड

शाळेत बाई म्हणाल्या : आपल्या

आवडत्या विषयावर निबंध लिहा..

एका मुलाने निबंध लिहिला...

विषय -

                 दगड                   

____________________________________


'दगड' म्हणजे 'देव' असतो..

कारण तो आपल्या आजूबाजूला

सगळीकडे असतो.. पाहीलं तर दिसतो..

अनोळख्या गल्लीत तो

कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो..

हायवे वर गाव

केव्हा लागणार आहे ते दाखवतो..

घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो..

स्वैयंपाक घरात

आईला वाटण करून देतो.. 

मुलांना झाडावरच्या

कैऱ्या, चिंचा पाडून देतो..

कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून

भळाभळा रक्त काढतो आणि

आपल्या शत्रूची जाणीव करून देतो..

माथेफिरू तरुणांच्या हाती लागला तर,,

काचा फोडून त्याचा राग शांत करतो..

रस्त्यावरच्या मजुराचं

पोट सांभाळण्यासाठी

स्वत:ला फोडुन घेतो..

शिल्पकाराच्या मनातलं

सौंदर्य साकार करण्यासाठी

छिन्निचे घाव सहन करतो..

शेतकऱ्याला

झाडाखाली क्षणभर विसावा देतो..

बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी

अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो..

सतत आपल्या मदतीला

धावून येतो, देवा'सारखा..

मला सांगा,,

'देव' सोडून कोणी करेल का

आपल्यासाठी एवढं ??

बाई म्हणतात -

तू 'दगड' आहेस,, तुला गणित येत नाही..

आई म्हणते -

काही हरकत नाही,,

तू माझा लाडका 'दगड' आहेस..

देवाला तरी कुठे गणित येतं ! नाहीतर

त्याने फायदा-तोटा बघितला असता..

तो व्यापारी झाला असता." 

आई म्हणते -

दगडाला शेंदुर फासून

त्यात भाव ठेवला की,,

त्याचा 'देव' होतो ~

म्हणजे, 'दगड' च 'देव' असतो ~

🎁🏆🏅

पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले

________________________________

लेखक : अज्ञात 

वरील लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा 

आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका !

__________________________________________


🌸💐🌸


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...