Posts

Showing posts with the label भाषाविवाद - बोधकथा

भाषाविवाद - बोधकथा

  कलकत्त्यात एकदा महिलांचे संमेलन भरले होते.  अध्यक्षस्थानी सरोजिनी नायडू होत्या. परस्पर परिचयानंतर भाषणाच्या व आपापले विचार मांडण्याचा कार्यक्रम होतो . वक्त्यांची भाषणे सुरु झाली . काही महिला उर्दूत , काही बंगालीत तर काही कन्नड भाषेत बोलत होत्या. गंमत म्हणजे प्रत्येक बोलणारी दुस-या भाषेवर टीका करीत होती.  आपलीच भाषा श्रेष्ठ असून , दुसरीत कसे दोष आहेत ते दाखवत होती . सरोजिनी नायडूंना त्या  गोष्टींचे आश्चर्ययुक्त दु:ख होत होते. इतक्यात कार्यक्रमाची एक कार्यकर्ती त्यांच्याकडे आली व म्हणाली , " बाई आपल्या  घरून फोन आला आहे. लहान मुलगा खूप रडत आहे.  कोणाकडूनच तो शांत होत नाही. तेव्हा आपल्याला लगेच घरी बोलावलं आहे ."सरोजिनीबाई उभ्या राहिल्या . उपस्थित महिलांना त्यांनी घरचा निरोप सांगितला व म्हणाल्या,  " घरी जाण्यापूर्वी मात्र मुलाला सांभाळणा-या बाईला फोनवरून विचारून घेते , की तो कोणत्या भाषेत रडत आहे ते सांग ." तो टोमणा ऐकल्यानंतर उपस्थित सर्व महिला खजील झाल्या. भाषाप्रेमी , सर्व भाषांवर सारखेच प्रेम करणा-या महान विदुषी सरोजिनी नायडू हसत हसत घरी गेल्या . 🔹🔹🔹🔹🔹