भाषाविवाद - बोधकथा

  कलकत्त्यात एकदा महिलांचे संमेलन भरले होते.  अध्यक्षस्थानी सरोजिनी नायडू होत्या. परस्पर परिचयानंतर भाषणाच्या व आपापले विचार मांडण्याचा कार्यक्रम होतो . वक्त्यांची भाषणे सुरु झाली . काही महिला उर्दूत , काही बंगालीत तर काही कन्नड भाषेत बोलत होत्या. गंमत म्हणजे प्रत्येक बोलणारी दुस-या भाषेवर टीका करीत होती.  आपलीच भाषा श्रेष्ठ असून , दुसरीत कसे दोष आहेत ते दाखवत होती . सरोजिनी नायडूंना त्या  गोष्टींचे आश्चर्ययुक्त दु:ख होत होते. इतक्यात कार्यक्रमाची एक कार्यकर्ती त्यांच्याकडे आली व म्हणाली , " बाई आपल्या  घरून फोन आला आहे. लहान मुलगा खूप रडत आहे.  कोणाकडूनच तो शांत होत नाही. तेव्हा आपल्याला लगेच घरी बोलावलं आहे ."सरोजिनीबाई उभ्या राहिल्या . उपस्थित महिलांना त्यांनी घरचा निरोप सांगितला व म्हणाल्या,  " घरी जाण्यापूर्वी मात्र मुलाला सांभाळणा-या बाईला फोनवरून विचारून घेते , की तो कोणत्या भाषेत रडत आहे ते सांग ." तो टोमणा ऐकल्यानंतर उपस्थित सर्व महिला खजील झाल्या. भाषाप्रेमी , सर्व भाषांवर सारखेच प्रेम करणा-या महान विदुषी सरोजिनी नायडू हसत हसत घरी गेल्या .
🔹🔹🔹🔹🔹
    तात्पर्य
🔸🔸🔸🔸🔸
   बहुभाषीय , बहुधर्मीय समाजात सर्व धर्मांप्रमाणेच सर्व भाषांचाही आपण आदर केला पाहिजे. आपल्या भाषेबरोबर दुस-या भाषेकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन समजूतदारपणाचा व सहानुभूतीचा असावा .
    भाषेने समाज जोडला गेला पाहिजे तोडला जाता कामा नये .

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !