कविता :- आतुरता
_________________________________________ दिनांक :- 22 ऑक्टोंबर 2020 ला मराठीचेे शिलेदार समूहावर प्रकाशित झालेल्या बेस्ट पाच कविता _______________________________________ आतुरता आस लागली दर्शना दर्शना बा विठ्ठलाची वारी कार्तिकी समीप आतुरता पंढरीची ॥ मुख दर्शनासी तुझ्या तुझ्या मुकलो रे आम्ही द्वार उघड विठ्ठला वाळवंटी ये विश्रामी ॥ वर्ष सरत आले रे दु:ख थमता थमेना तुझ्या दर्शनाविना हे चित्त कशात लागेना ॥ तुच कष्ट निवारण्या धाव भक्तांच्या हाकेला पंढरीचा राजा तुझा भक्त दर्शना भुकेला ॥ आतुरता संपवून टाक एकदाची सारी करू दे आम्हां भक्तांना नित्य नियमाची वारी ॥ दत्ता काजळे (ज्ञानाग्रज) उस्मानाबाद ©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह 🌸💐🌸💐🌸 आतुरता मनी दाटली मला माझ्या विद्यार्थ्यांना भेटायची सांग सांग देवा आता शाळा कधी उघडायची बे एके बे बे दुणी चार शिकवायचा मला शिष्टाचार दुःख करायची वजा अन सुखाचा करायचाय गुणाकार...