◼️ Bill gates :- एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व
🎂 'मायक्रोसॉफ्ट’चे सहनिर्माते बिल गेट्स यांचा आज ६५ वा वाढदिवस. त्यांना लाख लाख शुभेच्छा! ---------------- बिल गेट्स हे अमेरिकन बिझिनेसमन, संशोधक, संगणक प्रोग्रामर आणि इन्व्हेस्टर आहेत. त्यांच्याकडे एकही पदवी नसून ते सध्या जगातले तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी २०व्या वर्षीच एका लहान गॅरेज मध्ये पॉल ॲलन सोबत ‘मायक्रोसॉफ्ट’ नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली होती, जी आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळखली जाते. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे १९८७ पासून ‘फोर्ब्ज’ या मासिकाने सादर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या प्रत्येक यादीत त्यांचे नाव असून, १९९५ पासून २०१७ पर्यंत फक्त चार वर्षे सोडून ते यादीत पहिल्या क्रमांकावर होते. ऑक्टोबर २०१७ मध्ये ॲमेझॉनच्या जेफ बेझोस यांनी त्यांना मागे टाकले. आज बेझोस यांची संपत्ती १९३.१ अब्ज डॉलर्स असून गेट्स यांची संपत्ती ११४.८ अब्ज डॉलर्स आहे. गेट्स यांच्याबद्दल जितके बोलावे तितके थिटेच पडेल, अशी प्रचंड कमगिरी त्यांनी करून दाखवली आहे. अर्थात आर्थिक श्रीमं...