Posts

Showing posts with the label पैसे

ब्लॉगर महिन्याला किती पैसे कमावतात

Image
ब्लॉगर्स किती पैसे कमावतात याचा एक निश्चित आकडा सांगणं तसं कठीण आहे .  कारण लिखाणाचाच भाग असलं तरी ब्लॉगिंग हे आता एक परिपूर्ण वेगळं क्षेत्र झालेलं आहे .  त्यातून मिळाणारा आर्थिक फायदाही चांगला आहे .  त्यामुळे लिहिण्याची पध्दत ,  जनमानसात असलेलं स्थान ,  अनुसरण करणारी लोकं आणि स्वत :  घेत असलेली मेहनत या सगळ्यांची गोळाबेरीज अंतिम आकडा ठरवत असते .  एक मात्र निश्चित आहे ,  ब्लॉगिंगचं उत्तम ज्ञान असणारी आणि त्याकडे अतिशय गंभीरपणे बघणारी व्यक्ती महिन्याला एखादी नोकरी करणा - या किंवा व्यवसाय करणा - या व्यक्तीपेक्षाही खूप चांगले पैसे कमावू शकते .  तरीही पैशांच्या बाबतीत सांगायचंच झाल्यास ,  चांगले ब्लॉगर महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रूपये सहज कमावतात . भाषा  :   हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्यावरून ब्लॉगचा संचार आणि वाचकवर्गाची संख्या ठरते. संगणकाची प्राथमिक भाषा इंग्रजी असल्याने आणि भरपूर मजकूर त्याच भाषेत असल्याने सहाजिकच इंग्रजीत ब्लॉगिंग करणा-यांना भरपूर मागणी आहे. या भाषेत जगभरात मजकूर वाचला, शोधला आणि लिह...