ब्लॉगर महिन्याला किती पैसे कमावतात


ब्लॉगर्स किती पैसे कमावतात याचा एक निश्चित आकडा सांगणं तसं कठीण आहेकारण लिखाणाचाच भाग असलं तरी ब्लॉगिंग हे आता एक परिपूर्ण वेगळं क्षेत्र झालेलं आहेत्यातून मिळाणारा आर्थिक फायदाही चांगला आहेत्यामुळे लिहिण्याची पध्दतजनमानसात असलेलं स्थानअनुसरण करणारी लोकं आणि स्वतघेत असलेली मेहनत या सगळ्यांची गोळाबेरीज अंतिम आकडा ठरवत असतेएक मात्र निश्चित आहेब्लॉगिंगचं उत्तम ज्ञान असणारी आणि त्याकडे अतिशय गंभीरपणे बघणारी व्यक्ती महिन्याला एखादी नोकरी करणा-या किंवा व्यवसाय करणा-या व्यक्तीपेक्षाही खूप चांगले पैसे कमावू शकतेतरीही पैशांच्या बाबतीत सांगायचंच झाल्यासचांगले ब्लॉगर महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रूपये सहज कमावतात.

भाषा : हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्यावरून ब्लॉगचा संचार आणि वाचकवर्गाची संख्या ठरते. संगणकाची प्राथमिक भाषा इंग्रजी असल्याने आणि भरपूर मजकूर त्याच भाषेत असल्याने सहाजिकच इंग्रजीत ब्लॉगिंग करणा-यांना भरपूर मागणी आहे. या भाषेत जगभरात मजकूर वाचला, शोधला आणि लिहिला जात असल्याने सहाजिकच त्यात भरपूर पैसे आहेत. इंग्रजीच्या तुलनेत स्थानिक भाषेत ब्लॉगिंग करणा-यांना आजवर कमी मानधन मिळत असे. मात्र, अलिकडे स्थानिक भाषेत वाचन करणा-यांची आणि लिहिणा-यां तज्ज्ञांची संख्या वाढत असल्याने स्थानिक भाषेत लेखन करणा-यांनाही चांगलं मानधन मिळत आहे.

तज्ज्ञ बना : ब्लॉगिंग करणं ही एक कला आहे. कारण लिखाण हीच एक कला आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमची आवड काय आहे, हे निश्चित करावं लागेल. कारण त्यानुसार तुम्ही ब्लॉगिंग करायला लागलात तर संबंधित विषयातील तज्ज्ञ म्हणून लोकं तुमच्याकडे पाहू लागतील. त्यावरून लोकं तुमचं अनुसरण करतील आणि विविध ब्रॅन्डही तुमच्याकडे आकर्षित होतील. एखाद्या विषयात तज्ज्ञ असणं हीदेखिल अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे, कारण प्रत्येक विषयाची व्याप्ती मोठी असते आणि हल्ली माहितीचं महाजाल प्रत्येकासाठी उघडं झालं असलं तरी त्या महाजालातून नेमक्या गोष्टी शोधून काढून लोकांपर्यंत पोहोचवणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. म्हणूनच काय सांगयचं आणि काय नाही याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही तज्ज्ञ म्हणून ओळखले जाता.

ब्लॉगची मांडणी : ही गोष्ट तुम्हाला प्रसिध्दीच्या शिखरावर पोहोचवण्यास आणि पैसे मिळवून देण्यास मदत करते. एकदा का तुम्हाला तुमचा वाचक कळला की त्यानुसार मांडणी करणं सोपं होत असलं तरी ते कंटाळवाणं होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सतत. नवनवीन प्रयोग करत राहायला हवेत. इंटरनेट दिवसागणिक बदलतं, त्यामुळे बदलांची आता लोकांना सवय झालेली आहे. त्यानुसार तुम्हीदेखिल आवश्यक ते बदल करायला हवेत.

शब्दांच्या पलिकडे : केवळ लिखित माहितीवर हल्ली कुणाला विश्वास नसतो किंवा त्यांना रसही नसतो. आवश्यक असतो पुरावा. फोटो किंवा व्हिडिओचा. वेब हे व्हिज्युअली अपिल होणारं माध्यम आहे. त्यामुळे चांगल्या मजकुरासोबतच पूरक फोटो आणि व्हिडिओ असल्यास अधिकाधिक लोकं ब्लॉगशी जोडले जातात. सहाजिकच ब्लॉगवरील लोकांची ये-जा वाढल्याने त्याचा आर्थिक फायदा तुम्हाला मिळतो.

सातत्य आवश्यक : तुम्ही ब्लॉगिंगकडे उत्पनाचं साधन म्हणून पाहत असाल तर लिखाणात सातत्य ठेवणं गरजेचं आहे. कारण तर आणि तरंच तुम्हाला आर्थिक फायदा मिळू शकतो. आठवड्याच्या कुठल्या दिवशी आणि वेळी ब्लॉग प्रसिध्द होणार आहे, यावरूनही त्याला भेटी देणा-यांच्या संख्येत चढ-उतार होत असतात. भेटीचं पैशात रूपांतर होण्यासाठी ते आवश्यक आहे.

जाहिरातबाजी : जाहिरातदारांसाठी ब्लॉगर्स हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. जाहिरातदार त्यांच्या उत्पादनाच्या अनुषंगाने ब्लॉगर्सची निवड करतात आणि त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठीची किंमत ब्लॉगर्सना मोजतात. लोकांचा ब्लॉगला मिळणारा प्रतिसाद, ब्लॉग टाकण्याचं सातत्य, ठिकाण, वयोगट, महिला-पुरूष फॉलोवर्स या आकडेवारीनुसार आर्थिक मोबदला निश्चित केला जातो. हा मोबदला हजारांपासून लाखांपर्यंतही असू शकतो. सदर ब्रॅन्ड किती मोठा आहे, यावर ते अवलंबून आहे.

सर्वात महत्त्वाचे - केवळ पैशासाठी म्हणून ब्लॉगिंग करण्यापेक्षा खरंच तुमच्याकडे इतरांसोबत शेअर करण्यासारखे काही असेल तर डोळे बंद करून ब्लॉगिंग करायला सुरूवात करा. कारण तुमचा मजकूर चांगल्या दर्जाचा असेल तर लोक आवर्जुन वाचतात, तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षा वाढतात आणि अर्थातच त्याचा तुम्हाला आर्थिक फायदाही होतो.

जाता जाता.. मी आजवर खाद्यपदार्थ आणि त्यासंबंधित इतर विषयांवर केलेल्या लिखाणाचा ब्लॉग तयार करतोय. पदार्थांच्या पाककृतींच्या पलिकडे जाऊन त्यांचा इतिहास, ती मिळण्याची ठिकाणं, इराणी कॅफे, पदार्थांचे बदलणारे ट्रेंड अशा वेगवेगळ्या विषयांना वाहिलेला मराठीतील कदाचित हा एकमेव ब्लॉग असेल



Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...