कविता :- आतुरता

_________________________________________
दिनांक :- 22 ऑक्टोंबर 2020 ला मराठीचेे शिलेदार समूहावर 
प्रकाशित झालेल्या बेस्ट पाच कविता
_______________________________________
आतुरता

 आस लागली दर्शना
 दर्शना बा विठ्ठलाची
 वारी कार्तिकी समीप
 आतुरता पंढरीची  ॥

 मुख दर्शनासी तुझ्या
तुझ्या मुकलो रे आम्ही
 द्वार उघड विठ्ठला
 वाळवंटी ये विश्रामी ॥

 वर्ष सरत आले रे
 दु:ख थमता थमेना
 तुझ्या दर्शनाविना हे
 चित्त कशात लागेना ॥

 तुच कष्ट निवारण्या
 धाव भक्तांच्या हाकेला
 पंढरीचा राजा तुझा
 भक्त दर्शना भुकेला ॥

 आतुरता संपवून
 टाक एकदाची सारी
 करू दे आम्हां भक्तांना
 नित्य नियमाची वारी  ॥

 दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
 उस्मानाबाद
©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह
🌸💐🌸💐🌸

आतुरता मनी दाटली मला माझ्या विद्यार्थ्यांना भेटायची 
सांग सांग देवा आता शाळा कधी उघडायची

बे एके बे बे दुणी चार शिकवायचा मला शिष्टाचार 
दुःख करायची वजा अन सुखाचा करायचाय गुणाकार 
प्रार्थना म्हणायची आम्हाला सगळ्यांच्या सुखशांतीची 
सांग सांग देवा आता शाळा कधी उघडायची 

ऑनलाईन ऑफलाईन शिकून मुलं गेली थकून 
मोबाईल पाहून पाहून डोळे गेले दिपून 
सवय लावायची मला त्यांना अभ्यासाची 
सांग सांग देवा आता शाळा कधी उघडायची 

सुट्टीतल्या त्यांच्या गमतीजमती खोड्या अन कुरापती  
जाणून घ्यायच्या त्यांच्या साऱ्या करामती 
आतुरता मला त्यांना डोळे भरून बघायची 
सांग सांग देवा आता शाळा कधी उघडायची 

सौ अनिता व्यवहारे 
ता श्रीरामपूर जि अहमदनगर 
सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🌸💐🌸💐🌸

 आतुरता मनी दाटली कधी घेतो तू निरोप
 थांबवणार नाही कुणी तुला को रो ना म्हणत. 

 अचानक आलास अन भय  पेरले जगात
 जनलोकांचे स्वास्थ्य  पाठवून दिले तू ढगात

 तोंड मोकळे सोडल्याची दिलीस  मोठी शिक्षा
 आता तोंड बांधतोय  तरी मिळत नाही सुरक्षा 

 आरोग्यासोबत स्वच्छतेचे ही दिलेस तू धडे
 कुणाला जाऊ देत नाही तू  
कुणाकडे

 जिवंत माणसाची अन माणसं  जिवंत ठेवायची
किंमत मोजायला लावलीस तू कायमची 

 खूप काही शिकवलसं अन शिक्षा ही केलीस
कुणी कुणाच नसतं म्हणायची वेळ आणलीस 

दाद द्यावीशी वाटते तुझ्या शक्ती अन युक्तीची 
जगाला बदलवलंस तू चुटकीसरशी

 म्हणूनच आतुरता तुझ्या प्रतिबंधक लसीची
 प्रार्थनेतून आमच्या वाट दाखविल देव तुला तुझ्या घरची

 सौ अनिता व्यवहारे
 ता श्रीरामपूर जि अहमदनगर
 सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🌸💐🌸💐🌸

तुझ्या भेटीची आतुरता..
भितीपेक्षाही मोठी होती..
मनापुढे पाऊल धावत होते..
काट्याकुट्याची तमाच नव्हती..

त्या निर्जन एकांतस्थळी..
धावत पळत पोहचत होते.. 
दाटून येणाऱ्या कातरवेळी..
मनात काहूर पेटत होते... 

ओढ मनाची मनाला... 
वेड असेच लागत होते.. 
मिठीत विरघळणार्‍या देहाचे.. 
मोजक्या क्षणात भागत नव्हते...
 
पहिल्या भेटीच्या दरवळीत.. 
पूनर्भेटीचे संकेत होते.. 
किती धुंदल्या कातरवेळा...
गुढ गहिरे उकलत नव्हते..
 
ढळला सूर्य धुसर वाटा.. 
परतीचे वेध लागत होते.. 
सैल होणारी मधुमिठी 
ओठी स्वर गदगदत होते...
 
ऐक प्रिया ऐक आता... 
ही संपवून टाक आतुरता.. 
साहवत नाही दुरावा.. 
दाटून येते अधिरता.. 

तुझ्या नावाचा काकणचुडा
हातात माझ्या येऊ दे.. 
तुझ्या नावाने सौभाग्य मळवट... 
भाळी माझ्या भरू दे... 

विष्णू संकपाळ बजाजनगर औरंगाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🌸💐🌸💐🌸

सांगना रे  देवा आता
शाळा कधी उघडणार
कोरोनाला घालवून तू
आम्हा मित्राना भेटवणार

ऑनलाईन भेटतात सारे
पण शाळेची मजा येत नाही
मॅडमची नजर चूकून कोणाची
 खोडी काढता येत नाही

घरात बसून बसून आता
आम्ही सारे बोर झालो
मधल्या सुट्टीत शाळेबाहेर
चिंचा पेरू खायचे विसरून गेलो

शाळेच्या घंटिचा आवाज हा
आता कानाला ऐकू येत नाही 
बरेच दिवस झाले देवा आम्ही
मुलानी शाळाच पाहिली नाही

आम्हच काहि चुकल आसल तर
देवा आम्हा मुलांना माफ कर
ऑनलाईन शाळा नको आता
पहिल्या सारखी शाळा चालू कर

मोबाईलचा आता खरंच
आम्हाला आला रे कंटाळा
निरजिव मोबाईल सोबत
आता भरत राहते शाळा

सर मॅडम आम्हाला आता
पहिल्या सारखे रागवत नाही
काहि चुकलं जरी आम्हाला
कोणीच कसं बोलत नाही 

शाळा उघडण्याची आतुरता 
आता वाढू लागली आहे
खरचं सांग देवा आता
कोरोना कधी घालवणार आहे

विजय शिर्के , औ. बाद .
© सदस्य मराठीचे  शिलेदार समूह .

💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...