Posts

Showing posts with the label जिवन विचार - 114

जिवन विचार - 114

काळाच्या उदरातुन ऋतू जन्म घेतात आणि जातात. या सार्या जगाला व्यापून राहीलेला हा *काळ* कधी संपतच नाही. मानवी मनाला  अनेकदा असं वाटतं की संध्याकाळच्या वेळी पश्चिमेकडील आकाशात उधळलेल्या सप्तरंगाची छटा बघतच रहावे !  पण क्षणार्धात *काळ*  त्या रंगाना गिळून टाकतो!      आपण जेव्हा जीवनाचं सुरेल गाणं गात असतो तेव्हा काळ आपल्या जीवनसतारीच्या तारा केव्हा तोडतो तेच समजत नाही. हा कठोर *काळ*  म्हणजे साक्षात  मृत्यू होय. *''काळ फिरला की सुवर्ण मेरूही मातीचा बनतो".* अशा अनंत आणि अपरिमित काळाचं मोजमाप करन कशाने कराव तेच कळत नाही.   म्हणून *मानवाने उद्याचा भविष्यकाळ आजच्या चांगल्या  कर्मातून निर्मावा.*