Posts

Showing posts with the label गरुड भरारी - बोधकथा

गरुड भरारी - बोधकथा

गरूडभरारी म्हणजे काय ? 👌👌👌👌👌👌👌गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं. पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर. त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात. आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्...