जाणून घ्या कोणत्या देवीसमोर औरंगजेब ने गुडघे टेकले होते ते - इतिहास
भारतात अशी कितीतरी देवीची मंदिरे आहेत जी स्वत:मध्येच वेगळीआहेत. त्यांना प्रत्येकाला काही इतिहास आहे किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी खास आहे. आपल्या सह गतकाळातील आठवणी साठवून हि मंदिरे आजही पाय रोवून उभी आहेत याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. असेच एक देवीचे मंदिर आहे राजस्थानमध्ये! ह्या मंदिराचे नाव आहे जीण माता मंदिर! जयपूरपासून १२० किमी अंतरावर वसलेल्या ह्या मंदिराबद्दल सर्वात विचित्र म्हणा किंवा खास म्हणा अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे येथे देवी भक्तांच्या हातात प्रसादाच्या रूपाने दारू प्राशन करते. ह्या मंदिराबद्दल एक अशीही गोष्ट रूढ आहे की, जीण मातेचे मंदिर तोडण्यासाठी दिल्लीचा बादशहा औरंगजेबाने सैनिक पाठवले होते, परंतु त्याला हे मंदिर पाडण्यात त्याला काही यश आले नाही. हिंदू द्वेषाने भरलेल्या मुघल बादशहा औरंगजेबाने हे मंदिर तोडण्यासाठी एकदा हल्ला करण्याची आज्ञा दिली. त्याच्या सैनिकांना पाहून गावकरी प्रचंड घाबरून गेले.त्यांनी मंदिर न तोडण्यासाठी सैनिकांना खूप मनधरणी केली, त्यांची हरएक प्रकारे विनवणी केली. परंतु, बादशहा काही माघार घेण्याच्या पवित्र्यात नाही हे पाहिल्यावर गाव