जाणून घ्या कोणत्या देवीसमोर औरंगजेब ने गुडघे टेकले होते ते - इतिहास

भारतात अशी कितीतरी देवीची मंदिरे आहेत जी स्वत:मध्येच वेगळीआहेत. त्यांना प्रत्येकाला काही इतिहास आहे किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी खास आहे. आपल्या सह गतकाळातील आठवणी साठवून हि मंदिरे आजही पाय रोवून उभी आहेत याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. असेच एक देवीचे मंदिर आहे राजस्थानमध्ये! ह्या मंदिराचे नाव आहे जीण माता मंदिर! 
जयपूरपासून १२० किमी अंतरावर वसलेल्या ह्या मंदिराबद्दल सर्वात विचित्र म्हणा किंवा खास म्हणा अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे येथे देवी भक्तांच्या हातात प्रसादाच्या रूपाने दारू प्राशन करते. ह्या मंदिराबद्दल एक अशीही गोष्ट रूढ आहे की, जीण मातेचे मंदिर तोडण्यासाठी दिल्लीचा बादशहा औरंगजेबाने सैनिक पाठवले होते, परंतु त्याला हे मंदिर पाडण्यात त्याला काही यश आले नाही.            
हिंदू द्वेषाने भरलेल्या मुघल बादशहा औरंगजेबाने हे मंदिर तोडण्यासाठी एकदा हल्ला करण्याची आज्ञा दिली. त्याच्या सैनिकांना पाहून गावकरी प्रचंड घाबरून गेले.त्यांनी मंदिर न तोडण्यासाठी सैनिकांना खूप मनधरणी केली, त्यांची हरएक प्रकारे विनवणी केली. परंतु, बादशहा काही माघार घेण्याच्या पवित्र्यात नाही हे पाहिल्यावर गावकऱ्यांनी मंदिरात जाऊन देवीची आराधना केली आणि अहो आश्चर्यम जणू देवीने त्यांची आराधना ऐकली.मंदिर तोडायला आलेल्या सैनिकांवर अचानक मधमाशांचीच्या झुंडीने हल्ला चढविला. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट,घाबरलेल्या सैनिकांनी जीव वाचवण्याच्या उद्देशाने तेथून पळ काढला. असे म्हणतात की, दरम्यानच्या काळात औरंगजेबाआजारी पडला. त्याला कोणीतरी समजावले की देवीच्या अवकृपेमुळे हि परिस्थिती त्याच्यावर ओढवली आहे. आजार काही केल्या कमी होत नव्हता. शेवटी नाईलाजाने कट्टर इस्लाम मानणारा हा बादशहा देवीची माफी मागायला मंदिरात पोहोचला. त्याने जीण मातेची मनापासून माफी मागितली आणि मंदिरातील दिवा अखंड तेवत राहण्यासाठी दर महिन्याला सव्वा मण तेल अर्पण करण्याचं वचन बोलून दाखवलं. काही दिवसांतच बादशाह ठणठणीत झाला आणि म्हणतात तेव्हापासूनच मुघल बादशहाची या मंदिरावर श्रद्धा जडली. 
मंदिराबद्दल अजून एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती अशी की, जीण मातेचा जन्म घांघू गावातील एका चौहान वंशाच्या राजा घंघ यांच्या घरी झाला. मातेचा हर्ष नावाचा एक मोठा बंधू होता. दोन्ही भावंडांचाएकमेकांवर जीव होता. जीण मातेला शक्तीचे आणि हर्ष याला भगवान शंकराचे रूप मानले जाते. एकदा जीण माता आपल्या वहिनीसह पाणी भरण्यासाठी सरोवराकाठी गेली होती. तेव्हा दोघांत यावरून वाद झाला की, हर्ष सर्वात जास्त कोणावर प्रेम करतो? दोघींनी अशी पैज लावली की जिच्यावर डोक्यावरील घडा हर्ष अगोदर उतरवेल, त्यावरून हे स्पष्ट होईल की हर्ष सर्वात जास्त कोणावर प्रेम करतो.यानंतर दोघीही हर्षसमोर आल्या. हर्षने सर्वात आधी आपल्या पत्नीच्या डोक्यावरील मडके उतरवले आणि ही पैज जीण माता हरली. यामुळे नाराज होऊन जीण माता अरावलीच्या पर्वतरांगेतील काजल शिखरावर बसली आणि घोर तप करू लागली. हर्ष समजूत घालायला गेला, परंतु जीण माता परतली नाही आणि देवाच्या तपामध्ये लीन राहिली. बहिणीची समजूत काढण्यासाठी हर्षही भैरव तपस्येमध्ये लीन झाला. आता या दोघांची तपोभूमी जीणमाता धाम आणि हर्षनाथ भैरवाच्या रूपात प्रसिद्ध आहे. 
ह्या जीण माता मंदिरात दरवर्षी चैत्र शुद्ध ते नवमीपर्यंत दोन यात्रा असतात. दरम्यानच्या काळात भाविक मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. केवळ राजस्थानातीलच नाही तर संपूर्ण भारतातील भाविकांमध्ये जीण मातेबद्दल अपार श्रद्धा आहे. यात्रेच्या काळात येथे रात्री जागरण करण्याची आणी दान देण्याची प्रथा आहे. अजून एक विशेष आकर्षण म्हणजे ह्या मंदिरात बाराही महिने दिवा अखंड तेवत असतो.तर मग कधी राजस्थानच्या ह्या भागात गेलात की ह्या विशेष मंदिराला नक्की भेट द्या..! 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !