देवाशी संवाद - कविता
एक संवाद : देवासोबत ंंंंंंंंंंंंंंं एकदा माझ्या स्वप्नात देव आला, असतील प्रश्न मनात तर विचार म्हणाला... मनाशीच घातला मी माझ्या प्रश्नांचा मेळ, म्हणालो- "आहेत शंका अनेक पण तुला आहे का वेळ ?" देव हसला... आणि बोलला, माझा वेळ अमर्याद - अनंत, विचार मोकळेपणाने ठेवू नकोस कुठलीही खंत... मी म्हणालो- देवा, मानवी मुल्यांमधे काही वाटतो का तुला बदल ? मानवी जीवनातील कुठल्या गोष्टीबद्दल वाटतं का तुला नवल ? देव म्हणाला- आहेत अशा गोष्टी अनेक तू विचारलं म्हणून सांगतो, पण विचार कर स्वतःशीच का तू मला विचारतो... माणूस बालपणाला कंटाळतो मोठं होण्यासाठी धडपडतो, अन् मोठा झाल्यावर मात्र बालपणच पुन्हा मागतो !!! धावधाव धावून आरोग्य गमावतो पैसा मिळविण्या करीता, आणि मग पैसाच गमावतो आरोग्य राखता राखता !!! भविष्याबद्दलच्या काळजीने माणसाचे मन होते चिंतातूर, वर्तमान विसरतो आणि जगतो सापडत नाही जीवनात सूर !!! जगण्यासाठी करतो धडपड स्मरण त्याला मरणाचं नाही, मरतो तेव्हा वाटतं की हा खरं जीवन कधी जगलाच नाही !!! होता देवाच्या हाती माझा हात मी झालो एकदम स्तब्ध... शांत... देव म्हणाला - आलं ना लक्षात