भगवान महावीरांची महान जीवन गाथा - जीवनी / biography
जैनांचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीरांनी उभे आयुष्य संपूर्ण मानव जातीला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरून जाण्याचा मार्ग दाखविला. आपापसात एकजुटीने रहाण्यास शिकविले, पशुहत्येचा, जातीपातीच्या भेदभावाचा कडाडून विरोध केला. भगवान महावीरांनी मानवतेच्या कल्याणासाठी ऐहिक वैभवाचा…समस्त सुख-सोयींचा त्याग करून तप-त्यागाचा मार्ग अवलंबिला होता. भगवान महावीरांचे अवघे जीवनच आपणा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. राजमहालात राहणाऱ्या महावीरांनी सगळ्या राजसुखाचा त्याग करून सत्याचा शोध घेतला आणि परम ज्ञानाची प्राप्ती करून घेतली त्याची जेवढी स्तुती गावी तितकी कमी आहे…या लेखातून भगवान महावीरांच्या जीवनाशी निगडीत महत्वपूर्ण गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आलाय. भगवान महावीरांची महान जीवन गाथा – Bhagwan Mahavir Swami Information in Marathi महावीरांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन – Mahavir Swami Biography in Marathi ई.स. 599 पूर्वी वैशाली राज्यात, क्षत्रियकुंड नगरीत, इक्ष्वाकू वंशाचे राजा सिद्धार्थ आणि त्रिशला राणीच्या पोटी चैत्र महिन्यातील त्रयोदशीला भगवान महावीरांचा सामान्य बालकाच्या रुपात जन्म झाला. स्वा...