जेव्हा दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार 30 वर्षांनी औरंगाबादेत येतो..
*औरंगाबाद* : एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या *उद्योगपतींची* उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्ष जुनी अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल. मात्र औरंगाबादेतील *काशिनाथ गवळी* यांची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी *केनियाचा रहिवासी* तब्बल 30 वर्षांनी भारतात आला. ही गोष्ट आहे *केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी याची..* सध्या केनियाचा रहिवासी असलेला रिचर्ड शिक्षणासाठी औरंगाबादेत होता. त्यावेळी परिस्थिती जेमतेम. खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची 200 रुपयांची उधारी फेडण्यासाठी *रिचर्ड तब्बल 30 वर्षांनी परत आला.* तब्बल 30 वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि औरंगाबादेतील *काशिनाथ गवळी* यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती. अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू तरळले आणि *प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव* या भेटीतून औरंगाबादच्या गवळी कुटुंबीयांना झाली. *खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत.* र