◼️ व्यवसायिक लेख :- एक सांगू ! बहीरे व्हा, यशस्वी व्हा!…
दोन बेडुक होते, खेळता खेळता दोघेही एका कोरड्या विहीरीत पडले. ती विहीर बर्यापैकी खोल होती. दोघेही वर येण्याचे खुप प्रयत्न करु लागले. बघता बघता इतर सार्या बेडकांचा गोतावळा विहीरीच्या काठावर गोळा झाला. विहीरीतले बेडुक थोडं वर चढायचे, आणि लगेच खाली पडायचे, त्यांना जागोजागी खरचटायला लागलं. वरुन त्यांच्या शुभचिंतकांनी त्यांना सल्ले देण्यास सुरुवात केली. कशाला धडपड करताय? ह्या विहीरीतुन तुम्ही कधीही वर येऊ शकणार नाही. आता आहात तसेच रहा. एवढं अंतर चढुन वर येणं, तुम्हाला कधीही शक्य होणार नाही. तेव्हा रक्तबंबाळ होण्यात काहीच अर्थ नाही, बाहेर येण्यास धडपडु नका. दोघांपैकी एका बेडकाने तो सल्ला ऐकला, आणि तळाशी जाऊन तो स्वस्थ बसला. त्यालाही वाटलं की आता इथुन बाहेर पडणं अशक्य आहे. दुसऱ्या बेडकाने मात्र प्रयत्न करणं चालु ठेवलं, तो उड्या मारत राहीला, वरुन जसजसा गोंगाट वाढला, तसतसे त्याचे प्रयत्नही वाढत राहीले. ...