Posts

Showing posts with the label जागतिक वसुंधरा दिना निमित्त अधिक माहिती

जागतिक वसुंधरा दिना निमित्त अधिक माहिती

आज वसुंधरा दिन. या वसुंधरेवर आपण जन्म घेतो, वाढतो आणि तिच्याच मातीत मिसळून शेवटचा श्वास घेतो. आख्खं आयुष्य आपण या पृथ्वीतलावर काढूनही तिच्याविषयी आपल्याला किती माहिती असते? फार कमी. म्हणूनच या वसुंधरेविषयीच्या काही मनोरंजक बाबींची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत.  या जगातील सगळ्यात तप्त जागा कोणती?  लिबियातील एल अझिझा ही जगातील सगळ्यात तप्त जागा आहे. १३ सप्टेंबर १९२२ ला या जागी जगातील आतापर्यंतचं सगळ्यात उष्ण म्हणजे ५७.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.    जगातील सगळ्यांत थंड ठिकाण?  अंटार्क्टिकावरील वास्टोक हे पृथ्वीतलावरचं सगळ्यात थंड ठिकाण म्हणून नोंदवलं गेले आहे. २१ जुलै १९८३ रोजी तेथील तापमान उणे ८९ इतके नोंदवले गेले आहे.  अवकाशातून दरवर्षी किती धूळ पृथ्वीवर पडते?  याचे प्रमाण वेगवेगळे सांगितले जाते. पण यूएसजीएस या संस्थेच्या मते दरवर्षी एक हजार मिलीयन ग्रॅम्स किंवा अंदाजे एक हजार टन धूळ दरवर्षी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते.  जगातील सर्वांत उंचीवरून कोसळणारा धबधबा कोठे आहे?  व्हेनेझुएला येथील एंजल फॉल...