जागतिक वसुंधरा दिना निमित्त अधिक माहिती

आज वसुंधरा दिन. या वसुंधरेवर आपण जन्म घेतो, वाढतो आणि तिच्याच मातीत मिसळून शेवटचा श्वास घेतो. आख्खं आयुष्य आपण या पृथ्वीतलावर काढूनही तिच्याविषयी आपल्याला किती माहिती असते? फार कमी. म्हणूनच या वसुंधरेविषयीच्या काही मनोरंजक बाबींची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. 
अवकाशातून दरवर्षी किती धूळ पृथ्वीवर पडते? 
याचे प्रमाण वेगवेगळे सांगितले जाते. पण यूएसजीएस या संस्थेच्या मते दरवर्षी एक हजार मिलीयन ग्रॅम्स किंवा अंदाजे एक हजार टन धूळ दरवर्षी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते. 
जगातील सर्वांत उंचीवरून कोसळणारा धबधबा कोठे आहे? 
व्हेनेझुएला येथील एंजल फॉल्स हा सर्वांत उंचीवरून म्हणजे जवळपास ३२१२ फूटांवरून ( ९७९ मीटर) जमिनीवर कोसळतो.
गडगडाट कशामुळे होतो? 
तुम्ही वीज चमकल्यामुळे असे उत्तर द्याल. पण ते अर्धसत्य आहे. वीज चमकल्याने आजूबाजूचे ढग अत्यंत तापतात. त्यांच्यात निर्माण झालेली उष्णता सूर्यापेक्षा पाच पटीने जास्त असते. या अचानक निर्माण झालेल्या उष्णतेने हवा ध्वनीपेक्षा जास्त वेगाने प्रसरण पावते. त्यामुळे हवा दाबली जाऊन चकचकाट निर्माण होतो आणि त्यातून गडगडाट ऐकू येतो. 
जगातील सर्वांत मोठा ज्वालामुखी कोठे आहे? 
अमेरिकेच्या हवाई बेटांवरील मौना लोआ हा ज्वालामुखी जगात सगळ्यात मोठा आहे. त्याची उंची त्याच्या बेसहून पन्नास हजार फूटांहून (म्हणजे साडेनऊ मैल वा १५.२ किलोमीटर) अधिक आहे. मंगळावर असलेला ऑपिंम्पस मोन्स हा ज्वालामुखी तर सोळा मैल म्हणजे २६ किलोमीटर उंचीचा आहे. 
सर्वांत भयंकर भूकंप कोठे झाला होता? 
मध्य चीनमध्ये १५५७ मध्ये झालेला भूकंप पृथ्वीवरचा आतापर्यंतचा सर्वांत भयानक भूकंप मानला जातो. प्रामुख्याने मऊ दगड असलल्या गुहांमध्ये लोक रहात असलेल्या भागात हा भूकंप झाला आणि जवळपास ८ लाख ३० हजार लोकांना गिळंकृत करून गेला. त्याच चीनमध्ये अगदी आत्ता आत्ता म्हणजे १९७६ मध्ये तांगशान येथे झालेल्या भूकंपात अडीच लाख लोक मरण पावले होते. 
पृथ्वीचा मध्य कोठे आहे? 
पृथ्वीचा मध्य पृष्ठभागापासून ६ हजार ३७८ किलोमीटर आत आहे. विशेष आतमध्ये सगळा द्रव भरलेला आहे. वरचे आवरण फक्त ६६ किलोमीटर एवढे जाड आहे. नेहमीच्या भाषेत सांगायचे तर सफरचंदाच्या सालीपेक्षा थोडे जाड इतकेच. 
जगातील सर्वांत उंच पर्वत कोणता? 
अर्थात माऊंट एव्हरेस्ट. नेपाळ व तिबेटमध्ये असलेले माऊंट एवह्रसेट् हे शिखर समुद्रसपाटीपासून २९ हजार ०३५ फूट म्हणजे नऊ किलोमीटर उंच आहे. १९९९ मध्ये ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या आधारे याची उंची पुन्हा एकदा मोजण्यात आली. त्यावेळी त्याची उंची सात फुटांनी जास्त असल्याचे लक्षात आले. 
चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता? 
होय. चंद्र एक अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीच्या अगदी जवळ होता. त्याला स्वतःभोवती फिरायला फक्त वीस दिवस लागत. म्हणजे एक महिना वीस दिवसांत पूर्ण होत असे. त्यामुळे त्यावेळी पृथ्वीवरील दिवसही फक्त १८ तासांचा होता. चंद्र आजही पृथ्वीपासून दूर जातो आहे. त्याचा वेग वर्षाला चार सेंटीमीटर असा आहे. पृथ्वीचे परिवलनही मंदावते आहे. त्यामुळे दिवसांची लांबी वाढत आहे. आगामी काळात पृथ्वीवरचा दिवस ९६० तासांचा होईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. अर्थात त्याला पुष्कळ वर्षे लागतील. 
पृथ्वीवरची सर्वांत लांब नदी? 
अर्थात आफ्रिकेतून वाहणारी नाईल नदी. ही नदी ६ हजार ६९५ किलोमीटर लांब आहे.
जगातील सर्वांत दुष्काळी प्रदेश? 
चिली या दक्षिण अमेरिकी देशातील एरीका या भागात फक्त ०.०३ इंच पाऊस पडतो. व्यवहारिक भाषेत सांगायचं झाल्यास अशा पावसात कॉफीचा एक कप भरायला शंभर वर्षे लागतील. 
जगातील सर्वांत जास्त पाऊस कोठे पडतो? 
दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशातील लोरा या ठिकाणी ५२३.६ इंच पाऊस दरवर्षी पडतो. 
जगातील सर्वांत लांब दरी कोणती? 
अर्थात अमेरिकेतील ग्रॅंड कॅनियन. तिची लांबी ४४६ किलोमीटर आहे. पण मंगळावीरल व्हॅली मेरीनेरीसची तुलना करता ही दरीही छोटी पडेल. कारण मंगळावरच्या या दरीची लांबी आहे, तब्बल ४८०० किलोमीटर. 
हवेत फक्त ऑक्सिजन असतो?
पृथ्वीवर ८० टक्के नायट्रोजन असतो. आणि उरलेल्या भागात ऑक्सिजन आणि इतर घटक असतात. 
जगातील पाण्यापैकी समुद्रातील पाण्याचे प्रमाण किती? 
समुद्रातील पाणी जगाच्या एकूण पाण्याच्या तुलनेत ९७ टक्के आहे. म्हणजे तीन टक्के पाणी जगभरात पिण्यासाठी उपलब्ध आहे. 
जगातील सर्वांत मोठा समुद्र कोणता? 
पॅसिफिक अर्थात प्रशांत महासागर. त्याचे क्षेत्र १६५ मिलीयन स्क्वेअर मैल आहे. म्हणजे अटलांटिक समुद्रापेक्षा हा दुप्पट मोठा आहे. त्याची खोली सरासरी ३.९ किलोमीटर आहे.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...