◾ललित लेख :- स्ञी
आज स्त्रियांचा जन्मच मुळात नाकारतला जातो. पण स्त्रीयांमुळेच कुटुंबाचा वंशाचा वारसा पुढे-पुढे चालत राहतो हे समाज सोयिस्करपणे आज विसरला आहे. एक स्त्रीच पुर्ण कुटुंबाला शिक्षित करु शकते. आई बनुन, एका वटवुक्षाच्या सावलीप्रमाणे कुटुंबाचा मानसिक आधार बनुन. ऐतिहासिक काळापासून आईचं महत्त्व सर्वपरिचित आहे. महाराष्ट्राचे लढवय्या राज्यकते शुरवीर शिवाजी महाराजांची आई जिजाऊबाई ह्या शिस्तप्रिय आई म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या ह्या शिस्तप्रियतेचा फार मोठा वाटा शिवाजी महाराजांच्या यशात आहे. तसेच साने गुरजींच्या कथेतील शामची आई तिच्याविषयी कितीही लिहिले तरी शब्द अपुरेच पडतील. ती तर साक्षात वात्सल्याची मुर्तीच होती. असे इतिहासातील कितीतरी दाखले आपल्याला देता येतील. स्त्री ही विविध भावनांनी नटलेली आहे. दैवानं मातुत्वाचं दान तिच्या पदरात टाकून तिचं श्रेष्ठत्व सिद्ध केल़ं आहे. तिच्या मनात वात्सल्याची भावना निर्माण केली.स्त्रीच्या या विविध भावनांच्या शुंगारानं स्त्रीचं सौदर्य आधिकच खुलून दिसतं. आई या शब्दात मुळातच आप आणि ईश्वर म्हणजे संपूर्ण जग सामावलेल आहे. संस्काराची पहिली पायरी ही