◼️ ललित लेख :- दिवाळी


दिवाळी ची चाहूल लागली की घराघरांत साफसफाई, रंगरंगोटी जणू स्वच्छ, निर्मळ घर आणि मन हा सुंदर संदेश च घेऊन येते दिवाळी.. 👌🏻

सणाचा राजा 4-5 दिवस सणाला उधाण आले असते. सफाई नंतर घराघरांत सुरू होतो तो फराळ.... गोडवा एकवटेला लाडू, 👌🏻आत पोटात गोडवा साठवून वरून खुशखुशीत असलेली ओल्या नारळाच्या करंज्या 😋 चटकदार चिवडा, 🤩 खमंग चकली, 😍 गोड आणि खारे शंकरपाळी, 🥰कुरकुरीत शेव, 🥳 खसखस लावलेले अनारसे, 😎 यांचा सुगंध, सगळ्या ची चव जिभेवर रेंगाळणारी, फराळ तोंडात टाकताच विरघळणारे मन.... फराळाची मजा त्रृप्त करणारी 😊. हि दिवाळी वेगळी फराळ होऊ द्या चरच.... झाले ना👌🏻👍🏻
नंतर खरेदी बायकाचा जिव्हाळयाची,,,, सगळ्यांना कपडे नवीन,पुजेसाठी लागणार सामुग्री, रांगोळ्या खरेदी, नवीन वस्तू, नवीन दागिना असो खरेदीला उधाण 🥳 

पहिला दिवस वसूबारस गाय आणि वासरू प्राण्याची पुजा करा. प्राण्याचा आदर करा. सांगणारी महान संस्कृती. मग रांगच लागते धनत्रयोदशी, पाठोपाठ नरकचतुर्दशी, लक्ष्मी पुजन.... घरातल्या जिवंत लक्ष्मी चा आदर करा आपोआप लक्ष्मी घरी सुखात नांदतेच. नंतर पाडवा, बलिप्रतिपदा साडेतीन मुहर्तातला 1 मुहूर्त. पतीराजा चा ही थाट, उटणं, तेलाची मालिश, अभ्यंगस्नान पहाटे, मोती साबण हे समिकरण ठरलेलच. उठा उठा पहाट झाली.... सगळ्याना पाठ.👍🏻  नंतर भाऊबीज बहिण - भावाच्या पवित्र नात्यात गुंफलेला  औक्षण भावाला, ओवाळणी बहिणीला, माहेर सुख सोबतीला आणि काय हवं 😍 सगळ्या ना उत्साह, आनंद भरणारी दिवाळी. आप्तेष्टांच्या गाठीभेटी, प्रेम, आनंद आजकाल दुर्मिळ होत चाललेले घडते दिवाळी च्या निमित्ताने.  किंवा फक्त व्हाॅटस् अप वर शुभेच्छा 👍🏻 तेवढीच नातेवाईकांची आठवण 👍🏻

फटाके अनार / पाऊस, भुईचक्र, सुरसुरी, फटाक्यांची लङ, आकाशात झेपावणारे चमकणारे राॅकेट, टिकल्या फोडण्याची लहानपणीची मजा....  लहानपणी दिवाळी सुरू होण्यापूर्वी किल्ले करण्याची लगबग, 🥰 

अंगणात रंग भरणारी सुबक नक्षीदार रांगोळी, प्रकाश पसरविणारी 'ती' पणती, आकाशकंदील सोहळाच निराळा🤩  घर, अंगण सारे आनंदाने फुलून जाणार. 

सुट्या, घरीच, नातेवाईकात, बाहेर फिरायला उधाण.... 
कोरोना, प्रदुषण नियंत्रण, अशी कितीही बंधन असली तरी आनंदाने फुलून येणारी दिवाळी.... 😂😊 👌🏻

यात लज्जत वाढवणारी मजा दिवाळी अंक, 👌🏻🤩, दिवाळी पहाट सुरेल गाणी, 👌🏻 फराळ वाटण, कॅडबरी सेलिब्रेशन देण, ड्राय फ्रुटस पॅकेटस गिफ्ट्स देण्यात आनंद, फराळासाठी घरी बोलावण.... 

आजकाल वाढलेली सजण, सेलिब्रेशन फोटो काढून व्हाॅटस् अप स्टेटस ला ठेवण.  सोशल मीडिया वर शेअर करण, दिवाळी मेमरीज्. 👍🏻😊

कोरोना नी स्वच्छता शिकवली. तसच स्वदेशी वापर लोकल साठी व्होकल शिकवले. दिवाळी आनंद आपल्याला  कोरोना मध्ये हि मिळाला वरच्याचे आभार मानून  लेख संपवते. 

 लेखिका :- ✍️सौ. भाग्यश्री चाटी सांबरे

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !