देवाचा जन्म कसा झाला.
देव - देवाचा जन्म कसा झाला. देवानी माणसाला जन्माला घातला कि माणसानं देवाला जन्माला घातलं. फार पूर्वी जेव्हा माणूस इतर प्राण्यांसारखा जंगलात राहत होता तेव्हा त्याला भूकंप, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट ह्याची अनामिक भीती वाटायची. ह्या गोष्टी कशामुळे होतात जे त्याला माहित नव्हतं. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते आणि त्यांना उत्तरं नव्हती. मग त्याने त्या नैसर्गिक शक्तींना देव बनवलं. सुर्य, वारा , पाऊस ह्यांना प्रसन्न करण्यासाठी तो त्यांची प्रार्थना करू लागला नंतर जेव्हा तो शेती करू लागला तेव्हा तो जमिनीलाच आपली आई समजू लागला. चांगला पिक हे सुपीक जमीन, पाऊस आणि सूर्यावर अवलंबून आहे हे कळल्यावर तो त्याची पूजा करू लागला. सध्या आपण ज्याला देव - धर्म म्हणतो ह्या पाच दहा हजार वर्षात निर्माण झालेल्या घटना आहेत. देवाची कल्पना माणसानं निर्माण केली आहे. आणि माणसानं निर्माण केलेल्या देवाला कसं मान्य करणार. माणसांनी त्याच्या कल्पना शक्ती आणि प्रतिभेतून देवाला जन्माला घातले. सगळ्या देवांची, देव कल्पनांची उपज माणसाच्या मेंदूतून झालेली आहे. आणि त्यांचे व्यवहार कसे असावेत, नसावेत यांची आखणीह