स्वप्न काय असते
स्वप्न जरूर पाहावी परंतु त्या स्वप्नांमध्ये स्वताला कधीच विसरू नये तसेच आपल्यांनाही कधी विसरू नये.स्वप्न पूर्तीसाठी सतत झटावं परंतु स्वप्न पूर्ण जर झाली नाहीत तर खचूनही जावू नये.कारण काळासोबत सर्व काही बदलत असते.प्रत्येक वेळेला सफलता हाताला येतेच किंवा येईल हे अजिबातच अपेक्षित नसते . जीवनात कधी चढ येतील तर कधी उतार ..पण ह्या चढ उतारात खचून जाण्याच कारण नाही.संयमाने जर घेतले तर जीवनाचे चढ उतार सहज पार होतील.आणि जीवन हळूहळू लक्षा कडे मार्गस्थ होईल.बर्याच अशा गोष्टी आहेत प्रयत्न करूनही फलीत होत नाहीत.म्हणून प्रयत्न सोडता येत नाहीत.दुखातही सुखाचा आभास असतोच . फक्त तो जाणवत नाही.पायात काटा रूतला तर दुःख होतेच परंतु तो काटा काढण्याचं सुख पण असतेच.आलेल्या दुःखाला मागे टाकण्यातच सुख असते परंतु ते फारसं जाणवत नाही.वेदना संवेदना म्हणजे जीवन ..या वेदना संवेदनांच्या हयातीतच आपण स्वप्न पाहतो.त्या मुळे कधी स्वप्न पूर्ण होतील तर कधी नाही.. म्हणून अपेक्षा ह्या अपेक्षे पुरत्याच असाव्या . अनाठायी अपेक्षा जेव्हा भंग पावतात तेव्हा मात्र येणारी नरवसता जीवघेणी असते.हि नरवसता येवूच नये यासाठी स्व