वृक्ष वल्ली आम्हां सोयरे - अभंग
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥२॥ आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥ कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥४॥ हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥ तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥६॥ संत तुकाराम