शर्यत जगण्याची - बोधकथा
रविवारची सुट्टी होती म्हणून एका मित्राच्या घरी गेलो होतो._ _आम्ही गप्पा मारत बसलो होतो इतक्यातच त्याचा मुलगा आला._ _" काय रे कुठं गेला होतास ? " मी विचारलं._ _" क्लासला." एवढा एकच शब्द बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला._ _त्याच्या वडिलांनी नंतर त्याला हाक मारली_ _" अरे ये ना , काका आलेत बघ." "ते काय म्हणतात ते तर बघ ." वगैरे म्हणून बऱ्याच हाका मारल्या तरी तो बाहेर आला नाही._ _" काय बिघडलंय ? " मी विचारलं._ _" आज सहामाहीचे मार्क कळले ना ! दोन विषयांत नंबर हुकलाय ! " त्याची आई हसत हसत म्हणाली._ _" मग काय झालं ? " मी म्हटलं , " एखाद्या विषयात चार दोन मार्क कमी पडले तर बिघडलं कुठं ? "_ _" ते आपल्याला झालं! त्याचं तसं नाही._ _एखाद्या विषयात एखादा गुण कमी मिळाला किंवा एखाद्या विषयातला नंबर चुकला तरी त्याला तो पराजय वाटतो."_ _" चुकीचं आहे हे !" मी म्हटलं," तो कुठले खेळ वगैरे खेळत नाही काय ?"_ _" मुळीच नाही." त्याची आई बोलली ,"_ _तो अभ्यास सोडून दुसरं ...