झोप येत नाही ? जाणून घ्या उपाय ...
1. डोळ्याला दमवण्यासाठी वाचन करा लहानपणी अभ्यास करताना बंद होणाऱ्या डोळ्यांना उघडे ठेवणे फार अवघड जायचे. आठवतय? त्यातूनच आयडिया घेऊन डॉ. विन्टर यांनी असे सुचवले की झोपण्यापूर्वी एखादे पुस्तक, मॅगॅझिन वाचायला घ्या, पण हो… झोप उडवणारे काही वाचू नका. बेडरूममधील लाइटस अत्यंत मंद असावेत. फक्त पुस्तकांवर पडेल असे लाइटस वापरा. 2. डोके वापरा : आपले विचार विचलीत करणारी इलेक्ट्रॉनिक् साधने, उदा. मोबाइल, टॅबलेटस शक्यतो दूर ठेवा. रात्रीच्या वेळी मोबाइल स्क्रीनचा उजेड झोप न लागण्याचे कारण असू शकते. महत्त्वाचे म्हणजे डोक्यामध्ये एखाद्या स्वप्नवत गोष्टीचा विचार करा. काल्पनिक ही चालेल. जसे, की तुम्ही सहलीला गेला… तुम्हाला एखादे पारितोषिक मिळाले.. इ. त्या विचारात रमा. पहा मग कधी झोप लागली कळणार देखील नाही. 3. पडून रहा : झोप लागत नाही म्हणून बसून वा उभे राहून काही काम करत राहू नका. बुध्दीला तुमच्या उभे राहण्याने झोपायचे नाही असा सिग्नल जातो. म्हणून आपली पाठ टेका भले झोप येत नाही असे वाटले तरी. 4. रात्री उगाचच लाईट लाऊन घरभर फिरू नका : झोपेत