झोप येत नाही ? जाणून घ्या उपाय ...

1. डोळ्याला दमवण्यासाठी वाचन करा 







लहानपणी अभ्यास करताना बंद होणाऱ्या डोळ्यांना उघडे ठेवणे फार अवघड जायचे. आठवतय? त्यातूनच आयडिया घेऊन डॉ. विन्टर यांनी असे सुचवले की झोपण्यापूर्वी एखादे पुस्तक, मॅगॅझिन वाचायला घ्या, पण हो… झोप उडवणारे काही वाचू नका. बेडरूममधील लाइटस  अत्यंत मंद असावेत. फक्त पुस्तकांवर पडेल असे लाइटस वापरा. 


2. डोके वापरा : 



आपले विचार विचलीत करणारी इलेक्ट्रॉनिक्  साधने, उदा. मोबाइल, टॅबलेटस शक्यतो दूर ठेवा. रात्रीच्या वेळी मोबाइल स्क्रीनचा उजेड झोप न लागण्याचे कारण असू शकते. 
महत्त्वाचे म्हणजे डोक्यामध्ये एखाद्या स्वप्नवत गोष्टीचा विचार करा. काल्पनिक ही चालेल. जसे, की तुम्ही सहलीला गेला… तुम्हाला एखादे पारितोषिक मिळाले.. इ. 

त्या विचारात रमा. पहा मग कधी झोप लागली कळणार देखील नाही. 

3. पडून रहा : 



​ 

झोप लागत नाही म्हणून बसून वा उभे राहून काही काम करत राहू नका. बुध्दीला तुमच्या उभे राहण्याने झोपायचे नाही असा सिग्नल जातो. म्हणून आपली पाठ टेका भले झोप येत नाही असे वाटले तरी. 

4. रात्री उगाचच लाईट लाऊन घरभर फिरू नका : 



​ 

झोपेतून जागे झाल्यावर जर बाथरूमला जावे वाटले तर वाटेतील सर्व लाईट लावत जावू नका. मानवी मेंदू कोणत्याही प्रकाशाला जागे राहण्याचा एक सिग्नल आहे असेच समजतो. मग तो प्रकाश सूर्याचा असू दे वा दिव्यांचा. 

5. शरीरातील स्नायूचा ताण घालवा : 




हे काहीसे योगासनातील शवासन सारखे टेक्निक आहे. तुमच्या स्नायूंमधील तणाव कमी झाल्यास, तुमचे मन देखील तणाव विरहीत होते. म्हणून झोपलेल्या स्थितीत दीर्घ श्वासोश्वास करा, हळूहळू शांतपणे स्नायूमधील ताण कमी करा, अवयवांना सैल सोडा – पाय, हात, खांदा इ. अवयवातील ताठरता हळूहळू कमी करताच मेंदूला झोपण्याचा सिग्नल मिळेल. मग तुम्हाला जरूर शांत व गाढ झोप लागेल. 
​ 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...