दैव आणि कर्म :- बोधकथा
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶 आमच्या गल्लीत एक ,दुकानदार आहे. मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले कि बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचे उत्तर देवू शकतोस का? तो म्हणाला तुम्ही खुशाल विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. मी विचारले कि माणुुस मेहनत करतो, मग त्याला यश मिळाले,.कि तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले. मला सांग दैव श्रेष्ठ कि मेहनत? मला वाटले कि याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते एकुन मी अवाक झालो. . बोलती बंद त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली. त्याने उत्तर दिले, तो म्हणाला, मला सांगा तुमचे बँकेत सेफ डिपॉजीट चे लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात. एक तुमच्याकडे आणि एक बँक मँनेजर कडे. लॉकर उघडतानां त्या दोन्ही चाव्या लॉकर ला लावाव्या लागतात. तरच तो लॉकर उघडते अन्यथा नाही.बरोबर ना? मी म्हणालो बरोबर, ...