Posts

Showing posts with the label भाऊ बहीण विचार सांगड - बोधकथा

भाऊ बहीण विचार सांगड - बोधकथा

भाऊ "तुला हे स्थळ पसंत आहे का ?" तिच्या भाऊ ने तिला विचारलं. बहीण "हो छानच आहे. नावं ठेवण्यासारखं काय आहे तिथं ?" . भाऊ "हो , पण घर बघितलंस का , कसलं साधं आहे ? दगडमातीचं ! त्यातही नुसत्या दोनच खोल्या आहेत." . बहीण "म्हणून काय झालं ?" . भाऊ "त्यापेक्षा परवा आलेलं स्थळ काय वाईट आहे ? एवढा मोठा बंगला , नोकर चाकर , दहावीस गाड्या ! नुसता आरामच आराम !" . बहीण "ते स्थळ नको." . भाऊ "का ?" . बहीण " मी त्या मुलाशी बोललेय. त्याचे काही प्लॅनच नाहीत स्वतःच्या भविष्याविषयी. तिथं गेले तर माझ्या कर्तृत्वाला वाव मिळेलच असे नाही. सगळं काही पूर्वजांनी करून ठेवलंय . नवीन काय करायचं म्हटलं तर नवरा होय म्हणेल की नाही ही शंका ! त्याचं स्वतःचंच अजून काही ठरलेलं नाही.. त्याउलट आजचं स्थळ बघा ना ! सगळ्या गोष्टी अजून प्राथमिक स्टेजला आहेत. चांगलं घर नाही , घरात कुठल्याही सुखसोयी नाहीत , स्वतःला सिद्ध करण्यासाठी वावच वाव !" " . भाऊ... पण रोज सकाळी उठून म्हशीचं शेण काढावं लागेल. धारा काढाव्या लागतील , गोबरगॅसमध्ये शेण घालावं लागे