भाऊ बहीण विचार सांगड - बोधकथा

भाऊ "तुला हे स्थळ पसंत आहे का ?"
तिच्या भाऊ ने तिला विचारलं.
बहीण "हो छानच आहे. नावं ठेवण्यासारखं काय आहे तिथं ?"
.
भाऊ "हो , पण घर बघितलंस का , कसलं साधं आहे ? दगडमातीचं !
त्यातही नुसत्या दोनच खोल्या आहेत."
.
बहीण "म्हणून काय झालं ?"
.
भाऊ "त्यापेक्षा परवा आलेलं स्थळ काय वाईट आहे ?
एवढा मोठा बंगला , नोकर चाकर , दहावीस गाड्या !
नुसता आरामच आराम !"
.
बहीण "ते स्थळ नको."
.
भाऊ "का ?"
.
बहीण " मी त्या मुलाशी बोललेय.
त्याचे काही प्लॅनच
नाहीत स्वतःच्या भविष्याविषयी.
तिथं गेले तर
माझ्या कर्तृत्वाला वाव मिळेलच असे नाही.
सगळं काही पूर्वजांनी करून ठेवलंय . नवीन काय करायचं
म्हटलं तर नवरा होय म्हणेल की नाही ही शंका !
त्याचं स्वतःचंच अजून काही ठरलेलं नाही..
त्याउलट आजचं स्थळ बघा ना !
सगळ्या गोष्टी अजून
प्राथमिक स्टेजला आहेत.
चांगलं घर नाही , घरात
कुठल्याही सुखसोयी नाहीत ,
स्वतःला सिद्ध करण्यासाठी वावच वाव !"
"
.
भाऊ... पण रोज सकाळी उठून म्हशीचं शेण काढावं लागेल.
धारा काढाव्या लागतील , गोबरगॅसमध्ये शेण घालावं लागेल."
.
बहीण "मला आवडेल.
स्वतःचा संसार उभा करायचा तर
कामं ही करावी लागणारच.
यश आणि सुख हे
सहजासहजी मिळत नाही."
.
भाऊ "अगं ,पण सगळं सुख तुला तयार मिळेल ना ,
परवाच्या स्थळाचा विचार केलास तर !"

बहीण "तेच तर नकोय.
मी केवळ इतरांनी मिळवलेल्या
ऐश्वर्याचा उपभोग घेत राहिले तर माझं अस्तित्व कुठं राहिलं ? "
.
भाऊ "म्हणजे ?"
.
बहीण "मलाही श्रीमंत व्हायचं आहे पण ते स्वतः
प्रामाणिकपणे कष्ट करून आणि ही संधीही सर्वत्र मिळत नाही.
हा मुलगा चांगला आहे.निर्व्यसनी
आहे.स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा आहे.
लहानपणी वडील वारले ही खूप मोठी हानी झाली त्याची.
बापाचं छत्र नसतानाही तो डगमगला
नाही , भरकटला नाही.स्थिर राहिला.
एक दिवस जगात माझंही नाव करून दाखवीन म्हणाला.
सगळे माझे विचार.
एकमेकांचे विचार जुळले की संसार
सुखाचाच होणार.
.
बहीण,.. एक बैल कामसू आणि दुसरा
आळशी झाला की चांगली मशागत कधीच होणार नाही.
तसंच संसाराचंही आहे.
आता त्याच्याकडे किंवा माझ्याकडे काहीच नाही.
पण दहावीस वर्षांनंतर आमच्याकडेही गाडी असेल ,बंगला असेल ;
त्यावेळी आम्हांला
अभिमानाने सांगता येईल की
यातली प्रत्येक काडी आणि प्रत्येक वीट आम्ही आमच्या कष्टाने
मिळवलेली आहे.
अभ्यास करून नंबर मिळवण्यात खरी
मजा असते !
नुसतं खाऊन पिऊन लोळणं याला जर
कुणी सुख म्हणत असतील तर ते सुख मला नकोय .
🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

नवरीसाठी भरपूर नवीन उखाणे | Marathi Ukhane For Bride