◾विशेष लेख :- या गोजीरवाण्या घरात....
'या गोजीरवाण्या घरात.....' संजय धनगव्हाळ ****************** आलो...आ...लो.. थांबा जरा,एकसारखं दार काय ठोकताय....कोण... आपण ? 'मी राणे'....! 'हो का!मग बाहेर भिंतीवर घंटीची कळ अर्थात बटन लावलय ते नको का दाबायला दार ठोकताय तर'..... 'विद्यूतप्रवाह खंडीत झाल्या मुळे कळ अर्थात बटण दाबुनही घंटी वाजली नाही म्हणून मी दार ठोकले मग काय...' 'बरं बरं आपले येथे येण्याचे काय प्रयोजन, कशासाठी आलात आपण फक्त राणेच आहात की आणखी काही त्यापुढे नाव आहे...म्हणजे कसं आहे ते मंत्री महोदय नारायण राण्यांचे तुम्ही नातलग नसला तर मला नावाने होकारायला बरं वाटेल नाहीतर मग राणे साहेब म्हणून तुमचा सन्मान करायला बरे काय'! 'माझ नाव अजय' 'आता कस बरं या ..आत या...'आहो आपण मराठी माणस आहोत संक्षिप्तमधे नाव सागंण्याची प्रथा आपणच मोडायला नको का?नाही तर काय नाव सारखे असले म्हणजे एखाद्या व्हि आय पी कुटुंबातील आसल्याचा गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.' 'माझ्याकडे पाहुन तुम्हाला वाटंत का मी व्हिआयपी कुटुंबातला आसेल म्हणून'. 'आहो राणे हल्ली माणसे अ...