◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...




कृषी ग्रुप 1 :

कृषी ग्रुप 2 :

किसान सन्मान निधी 



कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.
हेक्टर = १०००० चौ. मी . 
१ एकर = ४० गुंठे 
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट 
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा 
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट

७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!
नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!
जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!


ग्रामपंचायत
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. 
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
                                                                                  
 * *गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
                                                                                  
 * *गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
                                                                                  
 * *गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
                                                                                  
 * *गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
                                                                                   * *गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
                                                                                  
 * *गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
                                                                                   * *गाव नमुना नंबर - 8अ - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
                                                                                   * *गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
                                                                                   * *गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
                                                                                   * *गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
                                                                                   * *गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
                                                                                   * *गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
                                                                                   * *गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
                                                                                   * *गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
                                                                                  * *गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
                                                                              तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.



________________________________




🤔 बियाणांची खरेदी करताय? मग वाचाच


बाजारातून बियाणे खरेदी करत असाल तर योग्य ती पारख असायलाच हवी अन्यथा फसगत होऊ शकते. म्हणून आज याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...  

🧐 'बोगस'चा सुळसुळाट : हल्ली बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. या कंपन्यांना शासनाची कोणतीही परवानगी नाही. सदर बियाणांमुळे जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे या कंपन्यांनी कोणतेही आश्वासन दिले तरी शेतकऱ्यांनी या आश्वासनांना बळी पडू नये.

💁‍♂ बियाणांची खरेदी करताना :

▪ सर्वात महत्वाचे म्हणजे अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणांची खरेदी करावी.
▪ बियाणांची खरेदी करताना पक्की पावती घ्यावी.
▪ बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व पॉकिटातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी.
▪ पॉकिटावरील बियाणे वापरण्याची अंतिम मुदत व किंमत तपासून घ्यावी.
▪ बोगस बियाणांविषयी काही तक्रारी असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.

👍 पक्के बिलच मागा : खासगी बियाणे कंपन्या दुकानदाराला मोठ्या प्रमाणात मार्जिंन देत असल्यामुळे बऱ्याचवेळा विक्रेते छापील किंमतीपेक्षा कमी किंमतीत बियाणे उपलब्ध करून देतात. मात्र बिल ओरिजनल न देता डुप्लिकेट बिल देतात.

या बिलाच्या माध्यमातून ते शेतकऱ्याकडून अधिक पैसे घेतात व ओरिजनल बिलावर मात्र कमी किंमत लिहितात. यामध्ये शेतकरी व शासनाची लूट होते. त्याचबरोबर बियाणे उगवले नाही. यासारखी समस्या निर्माण झाल्यास पक्के बिलच आवश्यक असल्याने शेतकऱ्यानी दुकानदाराला पक्के बिलच मागावे.

🔎 ..म्हणून बियाणांची पिशवी सांभाळा! : बियाणे खरेदी केल्यानंतर बियाणांची पिशवी, मूठभर बियाणे आणि पावती सांभाळून ठेवावी. कारण कंपनीने सांगितल्या प्रमाणे जर बियाणे उगवले नाही. तर अशा वेळी पक्के बिल आणि बियाणांची पिशवी आवश्यक ठरते. यामुळे ते कंपनीकडे झालेल्या नुकसानीचा दावा करू शकतात.

👀 बियाणांच्या तक्रारीसाठी काय कराल? : खत आणि बियाणे वाटपात अधिक पारदर्शीपणा आणण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी 'टोल फ्री' क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. कोणतीही तक्रार असल्यास 18002334000 या क्रमांकावर संपर्क साधून शेतकऱ्यांना आपली तक्रार नोंदवता येणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖













शेतकरी दिनानिमित्त एक उत्कृष्ट लेख...


व्यवसाय करू इच्छिणाऱ्या बांधवांसाठी हा खूप छान लेख आहे, नक्की वाचा...

व्यवसायाचे गूपित :

Business Formula - 1000 X 1000

श्रीनिवास जोशी हा माझ्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा होता. आम्ही सर्व त्याला श्री म्हणायचो. त्याचा नंबर नेहमी फक्त वर्गातच नव्हे तर आख्या शाळेत पण पहिला असायचा. मी त्यामूळे मुद्दामुच त्याच्याशी दोस्ती करून घेतली होती. प्रशांत कासट हा आमच्या वर्गातला दुसरा मुलगा होता. तो म्हणजे विरुद्ध टोक होता कारण तो ‘ढ’ कॅटेगरीतला होता. तो दरवर्षी कसा बसा काठावर पास होत वरच्या वर्गात चढत आला होता. त्याच्या वडिलांचे वाण्याचे दुकान होते. ते माझ्या घराजवळ असल्यामूळे अनेक वेळा आम्ही त्याच्या दुकानातून किराणा माल आणत असु. बहुतेक संध्याकाळी तो दुकानाच्या गल्यावर बसलेला दिसे. वर्गातील मुले त्याला ‘वाणी’ म्हणून चिडवायची. माझी आणि प्रशांतची मात्र चांगली मैत्री जमली होती. 

मॅट्रिकची परिक्षा ही त्यावेळी आयुष्यातील अत्यंत महत्वाची परिक्षा म्हणून ओळखली जात असे. त्यावेळी 11 वी ला मॅट्रिक असायचे. पुढील सर्व शिक्षण या परिक्षेतील मार्कांवर ठरायचे. त्यावेळी बोर्डात टॉपला आलेल्या पहील्या 30 मुलांची यादी वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायची. त्याला ‘मेरिट लिस्ट’ म्हणायचे. मेरिटमध्ये येणे हा फार मोठा बहुमान समजला जायचा. अमच्या वेळच्या मॅट्रिकच्या परिक्षेमध्ये श्रीने सर्व रेकॉर्ड्स तोडली. तो फक्त आमच्या शाळेतच नव्हे तर आख्या पुणे शहरात पहिला तर आलाच पण बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये पण चौथ्या क्रमांकावर झळकला. अर्थात आम्हाला याचा सार्थ अभिमान वाटला. प्रशांत मात्र कसा बसा 51 टक्के मार्क मिळवून सेकंड क्लासमध्ये पास झाला. 

अपेक्षेप्रमाणे श्री इंजिनिअरींगकडे गेला. बी. ई. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल झाला. इथे पण तो युनिव्हर्सिटी टॉपर होता. पुढे त्याला पुण्याच्याच एका चांगल्या कारखान्यात नोकरी मिळाली. आपल्या गुणांवर चढत चढत तो दहा वर्षांच्या आतच कंपनीचा प्रॉडक्शन मॅनेजर झाला. स्वतःचा फ्लॅट घेतला, गाडी घेतली, लग्न केले. प्रशांत मात्र कॉमर्सला गेला पण त्याला काही शिक्षण पुरे करता आले नाही. तो सेकन्ड इयरला असताना त्याचे वडील आजारी पडले. तो घरातील सर्वात मोठा असल्याने दुकानाची जबाबदारी त्याच्यावर पडली. त्यामूळे शिक्षण अर्धवट सोडून त्याला वडिलांच्या धंद्याची जबाबदारी घ्यावी लागली. 

श्रीने अचानक नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु केल्याचे मला कळले. त्याला कुठल्यातरी इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्सची एजन्सी मिळाली होती. श्रीने हातात असलेली चांगली नोकरी सोडून बिझनेस चालु करणे ही गोष्ट टिपिकल मध्यमवर्गीय मेन्टॅलिटी असलेल्या मला काही फारशी रुचली नाही. एकदा मला तो त्याचे ऑफीस दाखवायला घेऊन गेला. त्याचे ऑफिस एकदम पॉश होते, केबीनला ए.सी. बसवलेला होता. बाहेर सुरेख रिसेप्शनिस्ट होती. श्री सुट, बूट टायमध्ये होता. तो रुबाबात त्याच्या गाडीतून ऑफीसमध्ये येतो असे मला कळले. प्रशांतने मात्र काहीतरी वेगळाच उद्योग सुरू केला होता. त्याने भोसरीला स्वतःचे वर्कशॉप काढल्याचे मला कळले. धाकटा भाऊ हाताशी येताच त्याच्याकडे दुकानाची जबाबदारी सोपवून प्रशांतने हा नवीन उद्योग सुरू केला होता. त्याला वर्कशॉपमधले काही कळते का असा यक्षप्रश्न माझ्यापूढे होता. तो रोज मला त्याच्या जुन्या व्हेस्पा स्कुटरवर वर्कशॉपमध्ये जाताना दिसे. बहुतेक वेळा जेवणाचा डबा पण बरोबर असे. त्याच्या एकूण अवतारावरून त्याचे काही फारसे बरे चालले नसावे असे मला वाटे. असे असुनही अधुन मधुन आमची भेट होत असे आणि कोपर्यासवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला म्हणून आम्ही जात असु. कारण तेथील फिल्टर कॉफी लाजबाब असे. 

श्रीने अचानक त्याचा धंदा बंद केल्याचे मला कळले. कारण विचारले तेव्हा धंद्यामध्ये लॉस होतो असे सांगीतले. तो नोकरीच्या शोधात आहे असे पण मला कळले. पण तो जेव्हा प्रशांतच्या वर्कशॉपमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरीला लागल्याचे मला कळले तेव्हा धक्काच बसला. आमच्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा आमच्याच वर्गातील एका ‘ढ’ मुलाच्या कंपनीत काम करतो ही गोष्ट, नाही म्हटले तरी मला पचवणे अवघडच गेले. पण श्री लागल्यापसून प्रशांतच्या कंपनीत लक्षणीय बदल घडू लागले. प्रशांतने आपनी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड केली आणि श्रीला कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर केले. प्रशांतच्या वर्कशॉपची वेगाने तरक्की होत असल्याची लक्षणे मला दिसू लागली. प्रशांतने वडिलांचे जुने घर पाडून तेथे चार मजली पॉश इमारत उभी केली, मर्सिडिझ गाडी घेतली. जुन्या व्हेस्पा स्कुटरवरून फिरणारा प्रशांत आता मर्सिडिझमधून फिरू लागला. एक उद्योजक म्हणून तो ओळखला जाऊ लागला. तरी सुद्धा माझ्यासाठी तो पुर्वीचाच प्रशांत होता. अजुनही आम्ही कोपर्यािवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला जात होतो. 

एकदा आम्ही असेच कॉफी प्यायला बसलो होतो तेव्हा श्रीचा विषय निघाला. अर्थात श्रीमुळेच आपली तरक्की झाल्याचे प्रशांत नेहमीच आवर्जून सांगायचा. यावेळचा विषय मात्र श्रीच्या बिझनेसचा निघाला. त्याने बिझनेस बंद का केला हे कोडे मला काही उलगडत नव्हते. मी प्रशांतला याचे कारण काय असेल असे विचारले.

‘कारण त्याला 1000 X  1000 हा फॉर्मुला ठाऊक नव्हता म्हणून!’ प्रशांतने उत्तर दिले. 

‘ हा कसला फॉर्म्युला?’ मी प्रशांतला विचारले. 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖




प्रधानमंत्री पीक विमा योजना
    खरीप हंगाम 2019-20
(भारत सरकारची शेतकरी हिथार्थ योजना)

सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की,प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2019-20 चा पीक विमा भरणे सुरू आहे.

आपली पेरणी झाली असल्यास लवकरात लवकर पीक विमा भरून घ्या.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी असलेली पिके
सोयाबीन,कापूस ,तूर,मूग, उडीद,ज्वारी,सूर्यफूल,ई.....

(कसलीही लुबाडणूक नाही आणि कसलेही फसवणूक नाही, अगदी कमी वेळेमध्ये आपला पीकविमा भरून दिल्या जाईल.)

पीकविमा भरण्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) स्वघोषित पेरा प्रमाणपत्र( आमच्याकडे मिळेल)
3) सातबारा
4) नमुना 8 अ
5) बँक पासबुक

(पीकविमा भरण्यास नका करू ऊशिर, त्वरित विमा भरून राहा बेफिकीर.... )


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



🙏🏻
तमाम शेतकरी बंधु- भगिनींना कळविण्यात येते की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ( PM-Kisan ) लाभ देण्याची पात्र शेतकरी कुटुंबा करीता 2:00 हे.आर. पर्यत धारण मर्यादा होती, ती मर्यादा केंद्रशासनाने शिथील केली असुन बाकी अटी व शर्ती कायम ठेवल्या आहेत. या योजने अतंर्गत  सर्व शेतकरी पात्र कुटुंबाना प्रती वर्षी तीन समान हप्त्यांमध्ये 6000/- रु वितरीत करणेबाबत कृषी आयुक्त कार्यालया मार्फत दि. 13/06/2019 रोजी च्या पत्रान्वये  सुचित केलेले आहे,
त्या अनुषंगाने तमाम शेतकरी यांनी आपले बँक खाते क्रमांक व आधार कार्ड क्रमांक यांची झेराँक्स प्रत दोन दिवसाचे आत ग्राम पंचायत किंवा तलाठी कार्यालयात अथवा आपल्या गावासाठी नेमुन देण्यात आलेल्या पालक अधिकारी यांचे कडे तात्काळ जमा करावे.
बँक खाते क्रमांक व आधार कार्ड क्रमांक यांची झेराँक्स प्रत न आणून दिल्यामुळे सदर योजने पासुन आपण वंचीत राहिल्यास आपणच सर्वस्वी जबाबदार रहाल.
या बाबत आपण खबरदारी घ्यावी.
हि विनंती.
🙏🏻
इतर ग्रुपवर व्यापक प्रसिध्दी देण्याबाबत सहकार्य करावे.
खालील व्हाट्सअप च्या दिसणाऱ्या बटणावर क्लिक करून इतर ग्रुप वर पाठवावे


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖





आपल्या गावाकरीता   नेमलेले नोकर कीती?

*१)* ग्रामसेवक 
*२)*'ग्रा.पं.शिपाई 
*३)* ग्रा.पाणी पू.शिपाई 
*४)* ग्रामरोजगारसेवक 
*५)* ग्रा.काॅ.आॅपरेटर 
*७)* माध्यशाळा कर्मचारी' 
*८)* ऊच्चमाध्यमीक कर्मचारी 
*९)* जि.प.शाळा कर्मचारी 
*१०)* तलाठी 
*११)* मंडळ अधिकारी 
*१२)* बीटहवलदार      (पोलीस) 
*१३)* पशूवैद्यकीय अधिकारी 
*१४)* पशूवैद्यकीय शिपाई 
*१५)* क्रूषीसहाय्यक 
*१६)* बॅक कर्मचारी 
*१७)* सेवासहकारी सोसायटी कर्मचारी 
*१८)* सरकारी दवाखान्यातील कर्मचारी / नर्स 
*१९)* मलेरीया निर्मूलन कर्मचारी 
*२०)* नर्स सहाय्यक
*२१)* आशा वर्कर
*२२)* अंगणवाडी कर्मचारी 
*२३)* वायरमण
*२४)* सबस्टेशन कर्मचारी

तूम्हाला सेवा देण्यासाठी ठेवलेले दूकानदार स्वस्त धान्य दूकान व राॅकेल दूकानदार.


तूमचे सेवक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पाऊस पडला नाही तर ? निबंध !

मानवी जीवन हे पाण्यावर अवलंबून आहे. आपल्या जीवनात पाण्याचे खूप मोठे स्थान आहे. आपल्यालाच काय तर ह्या पृथ्वीतला वरच्या प्रत्येक सजीवाच्या आयुष्यासाठी पाणी हा घटक खूप महत्वाचा आहे. म्हणूनच म्हटले आहे की पाणी हेच जीवन आहे. पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी किंवा पृथ्वितला वरील पाणी पुरवण्यासाठी पाऊस खूप महत्वाचा आहे. त्यासाठी जरुरी आहे की पाऊस वेळेवर आणि भरपूर प्रमाणात पडला पाहिजे. पृथ्वीवरील गोड्या पाण्याचे मुख्य स्त्रोत पाऊस आहे. आणि असा हा सर्व सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असणारा पाऊस जर पडलाच नाही तर ?? बहुतेक, आपले मानवी जीवनच नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टीच कोलमडून जाईल! 

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते आणि जर एखाद्यावेळी पाऊस पडला नाही तर त्या भागात अतिशय दुष्काळ पडू शकतो आणि मानवाचे जीवन कठीण होऊन जाईल. अशा वेळेस पाऊस न पडल्यामुळे आपल्या पुढे अन्नाच्या समस्ये सोबतच तहान भागवण्याची समस्या देखील उभी राहील. सर्व काही कठीण होऊन बसेल. 

पाऊस पडला नाही तर नद्यामध्ये, तलावांमध्ये किंवा विहिरींमध्ये पाणी कुठून येणार? नद्या, विहिरी, तलाव हे सारे ओस पडून जातील. म्हणूनच दरवर्षी पाऊस पडणे फार आवश्यक आहे. पाऊस नाही तर मानवी जीवन नाही. पाण्याविना पशु-पक्ष्यांना पण खूप यातना सोसाव्या लागतील. 

शेतकऱ्याचे सर्व जीवन पावसावर अवलंबून असते. भर उन्हाळ्यात जमिनीची मशागत करून तो पाऊस येण्याची चातकासारखी वाट पहात असतो. पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याने कितीही श्रम केले, कितीही घाम गाळला तरीही गवताचे एक पाते देखील उगवू शकणार नाही. जर ही परिस्थिती काही वर्षे राहिली तर अन्न-धान्याचा भयानक तुडवडा निर्माण होईल, महागाई प्रचंड वाढेल. गरीब माणसे, पशु-पक्षी बिना अन्नाचे तडफडून मरून जातील. अश्या भयाण परिस्थितीची आपण कल्पना देखील करू शकत नाही. 

पाऊस पडला नाहीतर जमिनीत पाणी मुरणार नाही. जमिनीतील भूजल लवकरच संपून जाईल. जमिनी पाण्याविना सुकून त्यात भेगा पडतील. झाडे मरून जातील, व वनस्पतींवर अवलंबून असणारे सर्व पशु-पक्षी बिना अन्न-पाणी मरून जातील. हळूहळू सर्व जीवनच नष्ट होऊन जाईल आणि पृथ्वी इतर ग्रहांप्रमाणे मातीचा एक निर्जीव गोळा बनेल. आकाशातून सुंदर निळी-हिरवी दिसणारी ही पृथ्वी भकास आणि मलूल दिसू लागेल. 
धरतीवर पाऊस पडणे ही एक चक्र क्रिया आहे. धरतीवरील पाण्याचे बाष्पिभवन होऊन त्याचे ढग तयार होतात व काही कालावधीनंतर ते ढग थंड होऊन पाऊस पडतो. जर का तलाव, नद्या, विहिरींमध्ये पाणीच नसेल तर पाऊस कुठून पडणार. पाऊस पडला नाहीतर फक्त मानवी जीवन किंवा पशुपक्ष्यांचीच हानी होणार नाही तर झाडे झुडपे पण सुकून जातील. आपल्या धरतीवरील सारी जंगले नाहीशी होतील. काही वर्षातच सगळी हिरवळ गमावून बसेल हि पृथ्वी! आपली हरीभरी धरतीमाता सुकून ओसाड होऊन जाईल. 

पाऊस पडण्याआधी मोर नाचायला लागतात, कोकिळा गाण म्हणते. पण जर का पाऊस झाला नाही तर, आपल्याला मोर नाचताना दिसणार नाही व कोकिळा पण गाणे म्हणताना ऐकू येणार नाही. पाऊस पडला नाही तर पावसावर असंख्य कविता लिहिणाऱ्या कवींना प्रेरणा कुठून मिळणार? आपल्याला सर्वाना माहित आहे की इंद्रधनुष्य हे पावसाळयातच पाहायला मिळते. जर पाऊस पडला नाही तर आपल्याला सुंदर इंद्रधनुष्य कसे पाहायला मिळेल. लहान मुलांना इंद्रधनुष्य पाहण्याची फार आवड असते. पाऊस पडला नाही तर तो मुलांना दिसू शकणार नाही. 

पाणी आपल्या जीवनात जसे अत्यावश्यक आहे तसेच पाणी अजून एक मोलाचे काम करते ते म्हणजे वीजनिर्मिती. जर का पाऊस पडला नाही तर वीजनिर्मिती पण होणार नाही. विजेचा उपयोग आपल्याला प्रत्येक ठिकाणी होतो – मोठमोठे कारखाने, उद्योग, हॉस्पिटल, शाळा महाविद्यालय इत्यादी. आणि पाऊस न पडल्यामुळे हे सर्व उद्योग, शाळा, महाविद्यालये बंद पडतील. माणसाचा कमवण्याचा स्त्रोत संपून जाईल आणि जगभरात बेकारी निर्माण होईल. माणसांचे जगणे मुश्कील होऊन जाईल. 

पावसाचे जसे इतके सारे फायदे आहेत आणि तो आपल्यासाठी जसा अत्यावश्यक आहे तसेच त्याचे काही वाईट परिणाम देखील आहेत. जसे की, पाऊस जर अती प्रमाणात झाला तर पूर येऊ शकतो व त्यामुळे गावच्या गाव वाहून जाऊ शकते. पिकांचा नाश होऊ शकतो. पण ह्या सगळया समस्या परवडतील कारण यावर उपाय करता येऊ शकतात. पण जर पाऊस पडला नाही तर आपल्याकडे कुठलाही अन्य पर्याय उरणार नाही. पाण्याचे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे. म्हणून पाऊस हा पडलाच पाहिजे. 

पाऊस पडण्यासाठी आपल्याला निसर्गाचे पालन व रक्षण करावे लागणार. म्हणूनच म्हंटले आहे की वन है तो जल है और जल है तो कल है. आपण सर्वांनी दर वर्षी एक तरी झाड लावले पाहिजे आणि त्याची निगा राखली पाहिजे. वेळेवर पाऊस पडणे हि एक नैसर्गिक क्रिया आहे. ही क्रिया वेळेवर व्हावी म्हणून आपल्याला 
निसर्ग जोपासावा लागेल. तसेच पावसाच्या पाण्याचा साठा वेळोवेळी केला पाहिजे व पाणी जपून वापरले पाहिजे, कारण एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला किंवा पाऊस पडला नाही तर काही प्रमाणात आपण पाण्याच्या समस्येला तोंड देऊ शकतो. 

‘झाडे लावा झाडे जगवा आणि जीवन वाचवा’!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



*शेवटचे 4 दिवस फक्त*
*प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना २०१९*
बसव ऑनलाइन सेंटर 
🌿 शेतकरी बंधूंनो पेरणी झाली का?
झाली असेल तर मग वाट कत
शाची बघताय लवकरच पीक विमा फॉर्म आमच्याजवळ भरून घ्या,
*उशीर करू नका कारण*
*साईट फार लोड घेत असते.*
त्यामुळे लवकरात लवकर पीक विमा फॉर्म भरा आणि निवांत राहा....

🌿 कोणत्या पिकाला *प्रती हेक्टरी* किती भाव आहे ती माहिती, 👇🏻
  1. 🌿 *सोयाबीन =     ₹ ८६०*
  2. 🌿 *कापूस     =     ₹ २१५०*
  3. 🌿 *मूग          =     ₹ ३८०*
  4. 🌿 *ज्वारी      =     ₹ ४९०*
  5. 🌿 *तूर           =     ₹ ६३०*
  6. 🌿 *उडीद       =     ₹ ३८०*


📃 *लागणारी कागदपत्रे:--*
👉🏻 *७/१२ - होल्डिंग.*
👉🏻 *आधार कार्ड झेरॉक्स.*
👉🏻 *पीक पेरा स्वयंघोषित प्रमाणपत्र.*
👉🏻 *बँक पासबुक झेरॉक्स.*

🌿 *आजच आमच्या अधिकृत केंद्रावर पीक विमा फॉर्म  भरून घ्या आणि चिंता मुक्त व्हा....*

🌿 *ही उपयुक्त माहिती प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहचवा,* 
*शेअर करा.*
*एक मदत शेतकऱ्यांना....*
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
आपल्या जवळील *गजानन झेरॉक्स ऑनलाइन &सेंटर * ला भेट द्या*
*शासनाच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी अवश्य भेट द्या.*
    🏦 *ठिकान* 🏦  

*बसव ऑनलाइन सेंटर (बोलका रोड) कुरूळा ता.कंधार जी.नांदेड*

*आपला एक शेअर आपल्याजवळील शेतकऱ्याला मदत करू शकतो* !!!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🌾 खरीप पिक नियोजन



💁‍♂ प्रमुख खरीप पिकांचे पूर्व नियोजन कसे करावे व पिकांचे संकरित व सुधारित वाण याविषयी माहिती जाणून घेऊ. 

▪ पीक व्यवस्थापन करतांना खालील मुद्यांचा अवलंब करावा.

▪ मृद व जलसंधारण करण्याकरिता बांध बंदिस्ती, ओघळ व नाल्याचे उपचराची निगराणी व दुरुस्ती पावसाळयापूर्वीच करण्यात यावी.

▪ जमीन व पाऊसमानानुसार पीक पध्दती निवडावी.

▪ मध्यम ते भारी जमीनीत कापूस, तुर, खरीप ज्वारी व सोयाबीन सारखी पिके घ्यावीत.

▪ मध्यम जमिनीत सूर्यफुल, तुर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी सारखी पिके घ्यावीत.

▪ हलक्या जमिनीत बाजरी, कुलथी, तीळ, कारळ, एरंडी यासारखी पिके घ्यावीत.

▪ पेरणी योग्य पाऊस होताच (75 ते 100 मि. मी.) पिकांची पेरणी करावी.

▪ धुळ पेरणी करिता 25 टक्के क्षेत्रावर ज्वारी, मुग / उडीद सारख्या पिकाची निवड करावी.

▪ आंतरपिक पध्दतीमध्ये सं.ज्वारी + तुर (4:2), बाजरी + तुर (3.3), सोयाबीन + तुर (4:2), कापूस + उडिद/सोयाबीन (1:1) पीक पध्दतीचा अवलंब करावा.

▪ आवश्यकतेनुसार आपत्कालीन पीक नियाजन करावे.

▪ लवकर येणाऱ्या वाणांची निवड करावी, बियाण्याचे योग्य प्रमाण ठेवावे व बीज प्रक्रिया करावी.

▪ झाडांची योग्य संख्या ठेवावी. त्याकरीता दोन ओळीतील व दोन झाडात योग्य अंतर ठेवावे.

▪ पेरणी पूर्व मशागत, आंतरमशागत, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण व पीक संरक्षणाबरोबर, शेत पातळीवर जलसंधारणाकरीता परिस्थितीनुरुप योग्य मुलस्थानी जलसंधारण पध्दतीचा अवलंब करावा.

▪ अन्नद्रव्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे व एकात्मिक कीड व रोग नियंत्रण करावे.

▪ अतिवृष्टी दरम्यान शेतात साचलेले पाणी लवकरात लवकर शेताबाहेर काढण्यात यावे.

--{ वरील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा }--

एड कोड हाइट

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !