Posts

Showing posts with the label मराठीचे शिलेदार समूह

कविता :- विजयानंद

Image
दिनांक 25 ऑक्टोबर 2020 ला मराठीचे शिलेदार समूह प्रकाशित झालेल्या बेस्ट पाच कविता 💐 विजयानंद 💐 सोन्यासारखा सण हा दसरा चेहरा ठेऊ नित्य हसरा बंधुभाव तो मनी जपूनी विजयानंद करू साजरा सीमा ओलांडून आव्हानांचे गाठू शिखर यशाचं लुटून सोन प्रगतीच समृद्ध करा आयुष्य तुमचं राम रुपी सत्याने वध करू असत्य रावणाचा त्याग करण्या करू सुरुवात राग द्वेष मत्सर भावनांचा खरा विजयानंद क्षण असेल जेव्हा मिळवाल स्व वर ताबा समोरच्या व्यक्तीला बोलताना कधीही दोन मिनिट विचार करायला थांबा स्वतः आनंद मिळवायचा असेल तर दुसऱ्याला आनंद द्यायला शिका हेवेदावे विसरून मनीचे मदतीचा हात द्या एकमेका मिलन भूपेन डोरले पुणे सदस्या मराठीचे शिलेदार समूह 🌸💐🌸💐🌸   काव्यलेखनातून शोधतो कवी  आत्मिक विजयानंद समाधान  कवीकल्पनेतून शब्दांचे मोती  धुंडाळितो विसरून देहभान ॥  काव्यलेखन नोहेच सुलभ ते  विचारमंथनातून शब्द सुचे  त्या शब्दांना देवुनी आशयसार  कवी शब्दगुंफुनी कविता रचे ॥  काव्यचौर्य होता होई कासावीस  अंतर्मन हे हेलावून टाकते  विचारचक्र थांबुनी त्याचे तेंव्...