कविता :- विजयानंद
दिनांक 25 ऑक्टोबर 2020 ला मराठीचे शिलेदार समूह प्रकाशित झालेल्या बेस्ट पाच कविता
💐 विजयानंद 💐
सोन्यासारखा सण हा दसरा
चेहरा ठेऊ नित्य हसरा
बंधुभाव तो मनी जपूनी
विजयानंद करू साजरा
सीमा ओलांडून आव्हानांचे
गाठू शिखर यशाचं
लुटून सोन प्रगतीच
समृद्ध करा आयुष्य तुमचं
राम रुपी सत्याने
वध करू असत्य रावणाचा
त्याग करण्या करू सुरुवात
राग द्वेष मत्सर भावनांचा
खरा विजयानंद क्षण असेल
जेव्हा मिळवाल स्व वर ताबा
समोरच्या व्यक्तीला बोलताना कधीही
दोन मिनिट विचार करायला थांबा
स्वतः आनंद मिळवायचा असेल
तर दुसऱ्याला आनंद द्यायला शिका
हेवेदावे विसरून मनीचे
मदतीचा हात द्या एकमेका
मिलन भूपेन डोरले पुणे
सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🌸💐🌸💐🌸
काव्यलेखनातून शोधतो कवी
आत्मिक विजयानंद समाधान
कवीकल्पनेतून शब्दांचे मोती
धुंडाळितो विसरून देहभान ॥
काव्यलेखन नोहेच सुलभ ते
विचारमंथनातून शब्द सुचे
त्या शब्दांना देवुनी आशयसार
कवी शब्दगुंफुनी कविता रचे ॥
काव्यचौर्य होता होई कासावीस
अंतर्मन हे हेलावून टाकते
विचारचक्र थांबुनी त्याचे तेंव्हा
लेखनाचे मन परावृत्त होते ॥
दादांचा घ्यावा आदर्श वाचन वसा
आणि करावी विचारांची घुसळण
चिंतन,मनन करताना आपसुक
उतरेल पहा स्वनिर्मीत छान कवण ॥
ज्ञानाग्रज विनवितो आज घडीला
स्वानुभवाला पारखुनी घ्या लेखणी
विजयानंद मिळेल सत्वर मनाला
नाव होईल आपोआप काव्यांगणी ॥
दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
उस्मानाबाद
©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह
🌸💐🌸💐🌸
प्रयत्नाचा विजयानंद नक्कीच
प्राप्तीपेक्षा समाधान देत असे
यशाने हुलकावणी दिली तरी
अपयशाचा लवलेशही नसे ॥
कृतीशीलता अंगिकारुनी मार्ग
अनुसरावा नित्यनेमाने नवा
यशापयश पचवुनी सदैव
विजयानंदाचा मात्र ध्यास हवा ॥
वाममार्गे मिळणारा विजय हा
क्षणिक सुखाचा साथीच भासतो
चिरंतन प्रयत्नवादी यशाच्या
झोपाळ्यावरी झोका घेत असतो ॥
ध्येयपूर्तीची मनी आस धरूनी
खडतर मार्ग स्विकारुनी पाहू
असाध्य ते साध्य सायास करण्या
निरंतर प्रयत्न करत राहू ॥
दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
उमरगा जि.उस्मानाबाद
©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह
🌸💐🌸💐🌸
विजीविशा अमाप हृदयी
परिश्रमाची केली भरणी
निर्धार पक्का ध्यानीमनी
मार्गी सुविचारांची पेरणी
आशेचा किरण जोपासत
केलीत लाख संकटे पार
स्वकर्तृत्व, त्याग, कष्टावर
पदरी पडला यशाचा हार
विजयानंद हा अलौकिक
नयनी ओसंडून वाहतोय
शब्द मुके आज सर्व जरी
साक्ष प्रवास सारा देतोय
कुणी तर खूप साथ दिली
कुणी वेळेत हात झटकले
अकस्मातच ओढवलेल्या
परिस्थितींनींही शिकवले
अनुभवांचे ते खाचखळगे
मनगाभारी खोल रूजले
अपयशाचेही विष प्राशत
स्वप्न भवितव्याचे रंगवले
समाधान झळकते मुखी
विजयाने भरली ओंजळ
तृप्तीने तेजाळतोय आज
मज काळजाचा हा तळ
मीता नानवटकर नागपूर
©सदस्या मराठीचे शिलेदार समुह
🌸💐🌸💐🌸
आजच्या शुभ दिनी
पुरव देवा मनोकामना
दुःखीतांचे दुःख सरून
आनंद येऊ दे जीवना.….//
प्रयत्नाला यश मिळून
स्वप्नपूर्ती होऊ दे
कष्टभरल्या जीवनाचे
चीज शेवटी होऊ दे...//
राग लोभ मोह मत्सर
जळून खाक होऊ दे
दुसऱ्याच्या सुखाचा
विजयानंद वाटू दे....//
कोरोना महामारीचा
अंत आज होऊ दे
मानवाच्या संयमाचा
विजयानंद पसरू दे...//
सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे
कवयित्री/लेखिका/सदस्या
मराठीचे शिलेदार समूह
🔴🔷🔴🔷🔴🔷🔴🔷🔴🔷🔴🔷🔴
Comments
Post a Comment
Did you like this blog