Posts

Showing posts with the label खुप सुंदर आहे अवश्य वाचाच..

खुप सुंदर आहे अवश्य वाचाच.. जिवन विचार - 64

. बासरी ... 💠🍃💠🍃💠🍃💠🍃 बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात. 💠🍃💠🍃💠🍃💠🍃 पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात. 💠🍃💠🍃💠🍃💠🍃 त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी 'मी' येतो. याच 'मी'पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे. 💠🍃💠🍃💠🍃💠🍃 कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या,आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो,पण तो आम्हाला साधा भावही देत नाही. 💠🍃💠🍃💠🍃💠🍃  तू तर एवढी साधी; ना रूप ना काही.पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो. 💠🍃💠🍃💠🍃💠🍃  तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? बासरी हसली आणि म्हणाली, 'तुम्ही माझ्यासारख्या व्हा,मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.' 💠🍃💠🍃💠🍃💠🍃  अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, 'मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय. 💠