जिवन विचार - 54
माणूस वर्तमानकाळात वावरताना मनात उद्याच्या भविष्याची उज्वल स्वप्नं रंगवीत असतो ! तसं त्यात गैर असं काहीच नसतं ! मात्र , फक्त स्वप्नांच्या दुनियेतच दंग होत राहिला तर ती पुर्ण होण्यासाठी आवश्यक कर्तव्य कधी करणार हा प्रश्न असतो . कारण कोणतही स्वप्न नवसाने पुर्ण होत नसतं . त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो. कोणत्याही क्षेत्रात जा , उद्याचा भविष्यकाळ वर्तमानातील मेहनत व त्यागातूनच घडत असतो.