नवरदेवासाठी उखाणे / Marathi Ukhane For Groom
1) काही शब्द येतात ओठातून, …… चं नाव येतं मात्र हृदयातून. 2) कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास. 3) भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची. 4) पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक. 5) लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम. 6) सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप. 7) गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन. 8) संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका. 9) नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री. 10) दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला. 11) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा. 12) मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, …………….चे बरोबर बांधली जीवन गाठ. 13) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने. 14) पंचपक्वनाच्या ताटात वाढले ...