मधमाशांचे परोपकार :- बोधकथा
⚜️🔸☀️🔹🌞🔹☀️🔸⚜️ शहरापासून दूर एका घनदाट जंगलात एक आंब्याचे आणि लिंबाचे झाड होते. दोन्ही झाडे शेजारशेजारी होती. पण... शेजारी असूनही लिंबाचे झाड कधीही आंब्याच्या झाडाशी बोलत नसे. कारण आंब्याच्या झाडापेक्षा आपण उंच असल्याचा त्याला गर्व होता. *एकदा* काय झाले की, एक मधमाशांची राणी लिंबाच्या झाडापाशी गेली व ती लिंबाला म्हणाली, ''वृक्षदेवा, मी तुमच्या इथे मधाचे पोळे बनवू इच्छिते, तुम्ही मला याची परवानगी द्या.'' लिंबाचे झाड तिला म्हणाले, ''नाही मी अशी मधाची पोळी वगैरे काही बनवू देणार नाही'' हे सर्व ऐकून आंब्याचे झाड लिंबाला म्हणाले, ''अरे मित्रा, तू तुझ्यावर पोळे का बरे बनवू देत नाहीस कारण तुझ्यावर ते अतिशय सुरक्षित असेल.'' पण लिंबाचे झाड हटून बसले होते की ते मधाचे पोळे बनवू देणार नाही म्हणून. राणी मधमाशीने वारंवार विनंती करूनही लिंबाचे मन काही वळेना तेव्हा राणीने आंब्याच्या झाडाला फक्त एकदाच विनंती केली त्याबरोबर आंब्याच्या झाडाने परवानगी दिली. राणी मधमाशीने व तिच्या सहका-यांनी तिथे एक पोळे तयार