मधमाशांचे परोपकार :- बोधकथा
⚜️🔸☀️🔹🌞🔹☀️🔸⚜️
शहरापासून दूर एका घनदाट जंगलात एक आंब्याचे आणि लिंबाचे झाड होते. दोन्ही झाडे शेजारशेजारी होती. पण... शेजारी असूनही लिंबाचे झाड कधीही आंब्याच्या झाडाशी बोलत नसे. कारण आंब्याच्या झाडापेक्षा आपण उंच असल्याचा त्याला गर्व होता.
*एकदा* काय झाले की, एक मधमाशांची राणी लिंबाच्या झाडापाशी गेली व ती लिंबाला म्हणाली, ''वृक्षदेवा, मी तुमच्या इथे मधाचे पोळे बनवू इच्छिते, तुम्ही मला याची परवानगी द्या.''
लिंबाचे झाड तिला म्हणाले, ''नाही मी अशी मधाची पोळी वगैरे काही बनवू देणार नाही'' हे सर्व ऐकून आंब्याचे झाड लिंबाला म्हणाले, ''अरे मित्रा, तू तुझ्यावर पोळे का बरे बनवू देत नाहीस कारण तुझ्यावर ते अतिशय सुरक्षित असेल.''
पण लिंबाचे झाड हटून बसले होते की ते मधाचे पोळे बनवू देणार नाही म्हणून. राणी मधमाशीने वारंवार विनंती करूनही लिंबाचे मन काही वळेना तेव्हा राणीने आंब्याच्या झाडाला फक्त एकदाच विनंती केली त्याबरोबर आंब्याच्या झाडाने परवानगी दिली. राणी मधमाशीने व तिच्या सहका-यांनी तिथे एक पोळे तयार केले व सुखाने तेथे त्या राहू लागल्या.*काही* दिवसांनी तिथे काही माणसे आली व त्यांनी झाडे तोडण्याचे ठरविले. सुरुवातीला आंब्याचे झाड तोडायचे ठरले पण त्यांच्यातील एकाची नजर मधमाशीच्या पोळ्यावर गेली. त्यांनी मधमाशांना घाबरूनच ते तोडायचे टाळले पण शेजारील लिंबाचे झाड मात्र त्यांना सुरक्षित वाटले. कारण त्याच्यावर ना पोळे होते व त्याचे लाकूडही ब-यापैकी चांगले मिळणार होते. त्यांचे हे संभाषण लिंबाने ऐकले व तो घाबरून गेला पण तो काहीच करू शकत नव्हता.
दुस-या दिवशी परत तेच लोक आले व झाडाला कापू लागले तेव्हा लिंब ओरडू लागला, ''अरे कुणीतरी मला वाचवा नाहीतर हे लोक मला कापून टाकतील.'' तेव्हा मधमाशांनी त्या माणसांवर हल्ला केला व माणसांना पळवून लावले. लिंबाच्या झाडाने मधमाशांचे व त्यांच्या राणीचे आभार मानताच त्या म्हणाल्या, ''आभार जर मानायचे असतील तर आंब्याच्या झाडाचे माना कारण त्याच्या परवानगीनेच आम्ही येथे मधाचे पोळे तयार करू शकलो व लिंबवृक्षा आम्ही तुला वाचवू शकलो. आंब्याच्या झाडानेच आम्हाला तुला वाचविण्यासाठी सांगितले होते.''☀️ तात्पर्य :-
कधी कधी मोठेपणा आणि महान असल्याचा अभिमानच आपल्याला घमेंडी आणि क्रूर बनवतो. ज्यामुळे आपण आपल्या सच्च्या मित्रांपासून दूर होत जातो.
Comments
Post a Comment
Did you like this blog