रस्त्यावर पेन विकणारा झाला कॉमेडीचा बादशाह – जॉनी लिव्हर
जॉन प्रकाश राव ज्यांना आज आपण जॉनी लिव्हर नावाने ओळखतो. आपल्या अनोख्या अभिनयामुळे आणि विनोदी कलेने त्यांनी खूप लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. त्यांच्या याच प्रकारच्या अभिनयामुळे त्यांनी ऐकून ३५०+ चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि १३ फिल्म फेअर अवॉर्ड जिंकले आहेत. खरतर त्यांना छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यन्त सगळेच ओळखतात, पण खूपच कमी लोक असतील कि, जे त्यांच्या या यशाच्या मागचा संघर्ष जाणत असतील. चला तर मग जॉनी लिव्हर चा प्रवास आपण सुरुवाती पासून पाहण्याचा प्रयत्न करूयात. जॉनी लिव्हर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५६ मध्ये आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यामध्ये खूप गरीब कुटुंबात झाला. पण ते मुंबईच्या किंग सर्कल, धारावी मधे मोठे झाले. जिथे त्यांचे वडील हिंदुस्तान लिव्हर कंपनी मध्ये एक कामगार म्हणून काम करत होते. शिक्षणाबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी, ७ वि. पर्यंत आंध्र शिक्षा संस्थ्येमध्ये शिक्षण घेतले. त्यावेळी त्यांच्या घरची परिस्तिथी एवढी बिकट होती कि, त्यांना शिक्षण मधेच सोडावे लागले. मग आपले पोट भरण्यासाठी त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर पेन विकायचे काम सुरु केले. त्याचंबरोबर त्यांनी...