श्रीमंत कसे व्हायचे ? ह्या साठी विशिष्ट ॲप
बदलत्या काळासोबत जो राहतो तोच पुढे जातो. म्हणूनच काळानुरुप बदल करुन घेणे गरजेचे ठरते. सध्याच्या जमाना हा टेक्नॉलॉजीचा आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी पासून लांब जाऊन जमणार नाही. बदलत्या काळानुसार टेक्नॉलॉजी आत्मसात करणे आवश्यक आहे. प्रसिद्ध लेखक थॉमस सी कोर्ली यांनी सांगितले आहे कि, 'तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर प्रथम तुमच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल करावे लागतील'. यासाठी तुम्हाला टेक्नॉलॉजीची मदत होऊ शकते. सध्या अशी काही मोबाईल अॅप्स आहेत जे तुमच्या संपत्ती वाढीसाठी मदत करतील. कोणते आहेत हे अॅप्स त्याविषयी जाणून घेऊयात... 1)sunrise श्रीमंत होण्याचा राजमार्ग म्हणजे तुमचा रोजचा दिनक्रम. तुम्हाला तुमचा रोजचा दिनक्रम ठरवण्यासाठी हे अॅप मदत करेल. तुमच्या ड्यू डेट, मिटिंग, पूर्वनिर्धारित काम आदी गोष्टींची नोंद यात ठेवली जाते. त्यामुळे तुमच्याकडून एखादे काम विसरले जात नाही. 2)Sociidot श्रीमंत होण्यासाठी रोजचे धेय्य निश्चित असावे लागते. लॉंगटर्म आणि शॉर्टटर्म गोल निश्चित करण्यासाठी हे अॅप तुम्हाला मदत करेल. हे अॅप स्मॉल अॅक्शन टर्मने एक व्हिज्युअल रोड मॅप तयार करत