खरे वाक्य /जिवन विचार - 109
1)मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्याFCC तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!! ------------------------------------ 2)संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!! ------------------------------------- 3)कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..!! ------------------------------------ 4)जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..!! ------------------------------------ 5)खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!! ------------------------------------ 6)प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्य असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!! ------------------------------------- 7)आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास ...