जिवन विचार - 98
जीवनाचा खरा आनंद त्यांनाच कळतो, जे एखादे काम चिकाटीनं करत राहतात. झाडाच्या 🌳फांदीवर आपलं घरटं बांधणारी चिमणी 🕊 गवताची एकेक काडी आणून सुंदर घरटं तयार करते. चिकाटीनं सतत प्रयत्नाचं हे फळ नव्हे का? निसर्गातील अशी खूप उदाहरणे आपणांस घेता येईल. चिकाटीन आपलं जीवन उन्नत आणि उदात्त बनविनारी निसर्ग चित्रे किती मनोहर वाटतात. आपल्या भारतीय संस्कृतीत मानवाचा 'अमृतपुञ' म्हणून उल्लेख केला जातो , तो किती अर्थपूर्ण वाटतो. आभाळाचं पांघरूण आणि जमिनीचं अंथरुण करून अखंड पन्नास वर्षे ज्यांनी समाजसेवा केली असे थोर संत 🙏 गाडगेबाबा म्हणजे चिकाटी , काटकसर आणि स्वच्छतेचा उदात्त अविष्कार म्हटलं पाहिजे ! रंगाच्या लपेटीतून शब्दांना सजवीता प्राप्त करणारे रंगसम्राट आबालाल रहिमान म्हणजे चिकाटी , उत्साह आणि जिद्द याचं हे उत्तम उदाहरण होय. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला चिकाटी आणि जिद्द यांची घेता येईल. आपल्या जीवनात सतत काम, काम आणि काम हाच जीवनाचा खरा मंञ असतो. सतत कामामुळे माणसं मोठी होतात. आपल्या मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती हीच चिकाटीची खरी माता असते !