Posts

Showing posts with the label अर्जुन अप्पाराव जाधव

◼️ कविता :- विजय कारगीलचे... | Arjun Apparao Jadhav

Image
विज य का र गीलचे ... विजय कारगील चे मिळाले बलिदान देऊन । शुरपुत्रास गेली भारत माता घेऊन ।।धृ।। सत्यान्नवचे युद्ध पेटले  कारगिल वरती वीर दाटले  लढण्या शीर हाती ठेवून... ।।१।। शूरपने ते कारगीली चढले शत्रू सोबत निकराने लढले  बाजी प्राणाची लावून...।।२।। पटापट शत्रुस मारले कारगील युद्ध जिंकले तिरंगा रोविला नेऊन...।।३।। - ©अर्जुन आप्पाराव जाधव मु. नंदनशिवनी ता. कंधार जि. नांदेड संपर्क : jadhavarjun401@gmail.com _______________________________

◾ कविता :- माऊली

Image
माऊली महाराज कुरुळेकर यांना समर्पित कविता माऊली, शब्द तुमचे , विचार तुमचे तुम्हीच महाज्ञानी । मला वाटले म्हणून लिहितो  मी काय भोळा प्राणी  ।। माऊली , तुमचा आशीर्वाद आहे म्हणूनी । कमी नाही आम्हास पाणी ।। माऊली , परंतु माय माता भूमीही तहाणली आता । पाणी पाणी म्हणती सर्व हीच सर्वांची व्यथा ।। माऊली , सुज्ञ करा जना सांगा लावण्यास वृक्ष । दुष्काळ आहे वैरी सांगा टाळण्यास लक्ष ।। माऊली , दुष्काळाने घातला आहे बघा कसा घाला । कळू द्या सर्वांस बुद्धि द्या सर्वाला ।। माऊली, करतो विनवणी म्हणे तुमच्या रूपा । सुखी ठेवा सर्वां करा एवढीच कृपा ।। _______________________________ © अर्जुन अप्पाराव जाधव मु.पो. नंदनशिवनी ता.कंधार जि.नांदेड संपर्क :- 7887766849 🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐