Posts

Showing posts with the label मराठी कविता

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

Image
जीवनावर गहन सत्य सांगणारी अशीच एक माझी कविता उद्याा काय होणार कोणास माहीत    । आज जे आहेत ते उद्यास नाहीत   ।।धृ ।। माणसा जीवन हे विशिष्ट  । क्षणोक्षणी त्यात कितीतरी कष्ट ।। त्या कष्टास चल तू सोशीत ।।१।।  जीवन हे एक दुःखाचा बाजार । सुख  लोभाचा रे त्यास आजार ।।  त्या आजारास चाल तू विसरित ।।२।।  जीवन सुख दुःखाचा खेळ  क्षणोक्षणी संपते येते वेळ  वेळेचे जाणुनी घे हित ।।३।। एकदाच येते हे जीवन । वाग सर्वां सोबत आनंदानं ।। आनंदात राहा गात गीत ।।४।। जसं दिल देवान जिवन । तसं तोच देईल मरण ।। मरणास नको जाऊ तू भीत ।।५।। -©arjun apparao jadhav कविता कशी वाटली कमेंट मधे नक्की लिहा ... 🔴🔷🔴🔷🔴🔷🔴🔷🔴🔷🔴🔷🔴🔷🔴