Posts

Showing posts with the label यशप्राप्ती - बोधकथा

यशप्राप्ती - बोधकथा

एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.   स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात. तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील. तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे.मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला. तात्पर्यः     कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे. एका दिवसात यश प्राप्त होत नाही.